मुंबई। नगर सहयाद्री - उद्धव ठाकरे पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतात या खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणा...
मुंबई। नगर सहयाद्री -
उद्धव ठाकरे पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतात या खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले जे विधिमंडळात न येत नाहीत ते पंतप्रधान काय होणार? ही पदाची चेष्टा आहे असा पलटवार ठाकरे गटावर केला.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, काही दिवसापूर्वी खासदार संजय राऊत म्हणाले की उद्धव ठाकरे पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतात यांच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पलटवार करत चक्क हात जोडले “जाऊ द्या’ असे उत्तर दिले. ‘हा कहर आहे. जे मातोश्रीतून बाहेर ते येतच नाहीत. विधिमंडळात येत नाही ते कसे पंतप्रधान बनणार? ही तर त्या पंतप्रधा पदाची चेष्टा आहे ज्यांना हात वर केला की खाली आणायला ३ मिनिटे लागतात,’ असा टोला राणेंनी लगावला आहे.
राणे म्हणाले, ते असे फिरत राहिले तर जागेवर राहणार नाही. फिरवाफिरवी सुरू आहे. संजय राऊत यांनी आता कसे फिरवले, मी असे बोललोच नाही म्हणतात. ठाकरे यांचा आता विषय संपला, दुकान बंद झाले. आता महाराष्ट्रातून लवकरच लाॅकआऊट होईल, असेही ते म्हणाले.
COMMENTS