मुंबई। नगर सहयाद्री - द्वेष मूलक वक्तव्यांबाबत सरकारकडून कुठलीच कारवाई होत नसल्याबद्दल काल सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारवर कडक शब्दात ताशेरे ...
मुंबई। नगर सहयाद्री -
द्वेष मूलक वक्तव्यांबाबत सरकारकडून कुठलीच कारवाई होत नसल्याबद्दल काल सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारवर कडक शब्दात ताशेरे ओढले होते. सरकारी व्यवस्था निष्क्रीय, शिथील बनली आहे. ती वेळेवर काम करत नाही. जर शांतच बसून राहणार असेल तर मग ही व्यवस्था आहे तरी कशासाठी, असे म्हणत न्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली होती. याच मुद्द्यावरुन संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी राज्याला गृहमंत्री आहे का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
संजय राऊत म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला नपूंसक म्हटले आहे, जे सरकारबद्दल जनता आधीपासूनच बोलत आहे, तेच आता न्यायालयाने म्हणले आहे," अशा शब्दात संजय राऊत यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. "आजवर सर्वोच्च न्यायालय असे कोणत्याच राज्याबद्दल बोलले नाही. पण महाराष्ट्र सरकार बद्दल बोलले आहे," असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
बोलताना संजय राऊत म्हणाले, यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधताना डोळे उघडू का? बोलू का, बोलू नको ? वाचू का नको, वाचू का? हे जे चालले आहे. त्यामुळेच न्यायालयाने जातीय दंगली वाढाव्या, तेढ राहावी असे ते काम करत आहे. "राज्यात अस्थिरता राहावी असा या सरकारचा उद्देश असल्याचे म्हणत राज्यात गृहमंत्रालय अस्तित्वात नाही. फडणवीस निराश आणि वैफल्यग्रस्तपणे काम करत आहेत, असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला.
COMMENTS