निघोज | नगर सह्याद्री महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून विकासकामांना मोठे पाठबळ मिळत असून जिल्हा...
निघोज | नगर सह्याद्री
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून विकासकामांना मोठे पाठबळ मिळत असून जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत माध्यमातून विकासकामे सुरू असल्याची माहिती संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी दिली.
निघोज परिसरातील लामखडे वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळाखोल्या दुरुस्ती, संरक्षण भिंत बांधकाम व पेव्हिंग ब्लॉक बसविणे या दहा लाख रुपये निधीच्या विकास कामांचे उद्घाटन निघोज गटाचे सर्वेसर्वा सचिन पाटील वराळ यांच्या हस्ते, निघोजचे उपसरपंच माऊली वरखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
वराळ पाटील म्हणाले, यापुढेही मोठ्या प्रमाणात विकासकामे होणार असून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचा आशीर्वाद आपल्याला आहे. जिल्हा परिषद गटाचा विकासाभिमूख चेहरा निर्माण झाला आहे. शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर विकासकामे सुरू झाली. ३० कोटी रुपये खर्चून जलजिवन अंतर्गत स्वच्छ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तसेच निघोज- आळकुटी- गारखिंडी या रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती वराळ पाटील यांनी दिली आहे.
अध्यक्षस्थानी पोपट आप्पा लामखडे होते. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य भीमराव लामखडे, ग्रामपंचायत सदस्य शंकर पाटील वरखडे, हरिभक्त परायण बाळासाहेब महाराज वरखडे, अस्लमभाई इनामदार, नाना आप्पा लामखडे, विठ्ठल बुवा वरखडे, नारायण लामखडे, सुभाष वरखडे, शांताराम लामखडे, बाबाजी वरखडे, बबुशा वरखडे, कोंडीभाऊ वरखडे, शिवाजी चौधरी, गंगा वरखडे, सहाय्यक कामगार तलाठी सुनील उचाळे, नवनाथ लामखडे, अनिल व्यवहारे, आनंदा वरखडे, एकनाथ लामखडे, गोविंद लामखडे, ऍड. ज्ञानेश्वर लामखडे, शेखर वरखडे, निवृत्ती वरखडे, अक्षय वरखडे, रवी लामखडे, किरण वरखडे, वैभव वरखडे, शुभम लामखडे, गोकुळ लामखडे आदी उपस्थित होते
COMMENTS