बीड/ नगर सह्याद्री - पाऊस आणि गारपिठीने शेतकरी हैराण आहे तर दुसरीकडे शेतमालाला भाव मिळावा म्हणून तो अगतिक झाला आहे. पिकविलेल्या मालाला भाव म...
बीड/ नगर सह्याद्री -
पाऊस आणि गारपिठीने शेतकरी हैराण आहे तर दुसरीकडे शेतमालाला भाव मिळावा म्हणून तो अगतिक झाला आहे. पिकविलेल्या मालाला भाव मिळविणे त्याच्या हातात नाही. हा असा एकमेव व्यवसाय आहे कि उत्पादित झालेल्या मालाचे भाव त्याच्या उत्पादकाला ठरवता येत नाहीत. येथे तो माळ घेणारा भाव ठरवतो व उत्पादकही परवडत नसले तरी तो माल देऊन टाकतो. त्यामुळेच त्याच्या नशिबी दुर्दैवाचे दशावतार कायमच आहेत.संघटित सरकारी कर्मचारी लाखोंच्या घरात दार महिन्याला पगार घेतात तरी संप करून वेठीस धरतात . शेतकरी हताशपणे पाहत असतो सध्या कांद्याचे दर पडल्याने मातीमोल दराने कांदा विकावा लागत आहे. एवढंच नव्हे तर शेतकऱ्याला एकही रुपये हातात न मिळता उलट अडत्यालाच पैसे द्यावे लागत आहेत.बीडमधला असाच एक प्रसंग समोर आलाय.
शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आहे.बीडच्या जैताळवाडी गावातील शेतकरी भगवान डांबे यांनी दोन एकर शेतात कांद्याची लागवड केली. महागाचे बियाणे, लागवडीचा खर्च, खुरपणी, फवारणी, खते आणि काढणीचा खर्च सगळं मिळून ७० हजार खर्च आला. कांदा देखील चांगला निघाल्याने चांगलं उत्पन्न मिळेल असं स्वप्न भगवान यांनी पाहिलं होतं. कांद्याच्या ३५०० किलो माल सोलापूर मार्केटला पाठवला.चांगला भाव मिळेल अशी आशा डांबे यांना होती. मात्र कांदा विक्री केल्यानंतर शेतकऱ्याच्या हातात पडलेली पट्टी पाहून त्यांना धक्काच बसला. कारण अडत व्यापाऱ्याने आणखी १८०० रूपये जमा करा म्हणून शेतकऱ्याला सांगितलं. अडत व्यापाऱ्याच्या निरोपानंतर डांबे यांनी गावाकडून पैसे मागवून घेतले. सगळे पैसे देऊन रिकाम्या हाताने डांबे घरी आले.कुटुंबाने दिवस रात्र मेहनत केली. कांदा काढण्यासाठी मजूर मिळत नव्हते तर वयोवृद्ध असूनही कुटुंबातील सदस्यांनी कांदा काढला. पण मार्केटमधल्या अडत्याने ज्यावेळी १८०० रुपये भरा, असं म्हटलं, त्यावेळी आमच्या पायाखालची जमीनच सरकली.अक्ख कुटुंब रात्रभर रडत होते
COMMENTS