धुळे। नगर सहयाद्री - मालेगाव येथे जाणाऱ्या एका ट्रकमधून प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तंबाखू जप्त केल्याची बातमी समोर अली आहे. सुरत येथून म...
धुळे। नगर सहयाद्री -
मालेगाव येथे जाणाऱ्या एका ट्रकमधून प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तंबाखू जप्त केल्याची बातमी समोर अली आहे. सुरत येथून मालेगाव येथे विक्रीसाठी जाणार्या महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाल्याची वाहतूक धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रोखली आहे. ट्रकसह १२ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यासोबत चालकाही ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, प्लॉस्टीक कचराच्या आड गुटख्याची तस्क्ररी केली जात होती. या प्रकरणी साक्री पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरत येथुन निघालेल्या ट्रकमधून राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा विक्री करण्यासाठी साक्री-धुळे मार्गे मालेगाव येथे नेला जात असल्याची खात्रीशीर माहिती धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. त्यांनी तत्काळ आपल्या शोध पथकाला ट्रकचा शोध घेवून कारवाईचे आदेश केले होते.
धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ट्रकचा शोध सुरू केला. संशयीत ट्रक हा दहीवेलकडून साक्रीकडे जात असल्याचे दिसल्याने पथकाने ट्रक थांबविला. त्यावरील चालकाने त्याचे नाव शेख अस्लम शेख उस्मान (वय ४३ वर्षे, मालेगाव) असे सांगितले. विचारपुस केली असता त्याने उडवा-उडवीचे उत्तरे दिली.
ट्रकची तपासणी केली असत कचऱ्याचा आड ९८ हजार ४०० रूपयांचा विमल सुंगधीत पानमसाला व तंबाखूचा साठा आढळून आला. त्यासह १० लाखांचा ट्रक, ५ हजारांचा मोबाईल व १ लाख १५ हजारांचा प्लास्टीक कचरा असा एकुण १२ लाख १८ हजार ४०० रूपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.
COMMENTS