अरणगाव दुमाला येथील घटनेच्या गुन्हेगारांना अटक केल्याबद्दल केले अभिनंदन श्रीगोंदा : नगर सह्याद्री - बेलवंडी पोलीस स्टेशनची दि. २४ मार्च २०२...
अरणगाव दुमाला येथील घटनेच्या गुन्हेगारांना अटक केल्याबद्दल केले अभिनंदन
श्रीगोंदा : नगर सह्याद्री -
बेलवंडी पोलीस स्टेशनची दि. २४ मार्च २०२३ रोजी वार्षिक तपासणी झाली असता गुन्हे प्रतिबंधक खाली आयोजित केलेल्या बैठकीत कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या वतीने अरणगाव दुमाला येथील घडलेल्या घटनेतील आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणला म्हणून या कारवाई मधील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र चाटे, सहाय्यक फौजदार अंकुश ढवळे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन पठारे, सतीश शिंदे, विनोद पवार, रामदास भांडवलकर, कैलास शीपणकर, विकास सोनवणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल भाऊ शिंदे, दिवटे या सर्वांचे अभिनंदन व कौतुक केले.
बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीतील ४८ गावांमध्ये पोलीस मित्र व माजी सैनिकांना बरोबर घेऊन रात्रीची गस्त घालणे ,गावागावात ग्राम सुरक्षा पोलीस मित्र दल कार्यान्वित करणे, ग्राम सुरक्षा यंत्रणा तत्पर ठेवणे व गावागावांमध्ये प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे या प्रशंसनीय बाबी करण्याचा निर्णय बेलवंडी पोलीस स्टेशन ने घेतल्याबद्दल सहाय्यक फौजदार मारुती कोळपे, रावसाहेब शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल हसन शेख, खेडकर ,नंदकुमार पठारे, अविंदा जाधव, सुरेखा वलवे, यांचे कौतुक व अभिनंदन केले.
तसेच चिंभळा व घारगाव येथील पोलीस मित्रांना टी-शर्ट, लाठी व शिटी देऊन त्यांचा सन्मान केला. बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीतील ४८ गावातील पोलीस मित्र व माजी सैनिकांना अण्णासाहेब जाधव ,उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत भाग यांनी पोलीस मित्र होणे याबाबत आव्हान केले असता सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
COMMENTS