श्रीगोंदा / नगर सह्याद्री :- श्रीगोंदा तालुक्यातील म्हतारपिंप्री येथे कत्तलखान्याकडे घेऊन जाणारी एक गाई तीन लहान वासरे व टेम्पो श्रीगोंदा प...
श्रीगोंदा / नगर सह्याद्री :-
श्रीगोंदा तालुक्यातील म्हतारपिंप्री येथे कत्तलखान्याकडे घेऊन जाणारी एक गाई तीन लहान वासरे व टेम्पो श्रीगोंदा पोलिसांनी पकडून बाळासाहेब साहेबराव वाळके (वय ४० रा मखरेवाडी श्रीगोंदा) यास जेरबंद केले आहे. तर कुरेशी मोहिउद्दीन युसुफ रा खाटीक गल्ली श्रीगोंदा हा फरार झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की श्रीगोंदा तालुक्यातील म्हातार पिंपरी येथे दुपारी दोनच्या सुमारास गाडी क्रमांक एम एच १२ जेएफ ३५३९ मधून एक गाई तीन छोटी वासरे असे सुमारे २४ हजार रु किमतीचे श्रीगोंदा येथील खाटीक गल्ली श्रीगोंदा येथे बेलवंडी वरून कत्तल करण्यासाठी येत असताना पकडले. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल किरण घोंगडे यांच्या फिर्यादी वरून बाळासाहेब साहेबराव वाळके (वय ४० राहणार मखरेवाडी श्रीगोंदा) यास गाडी ताब्यात घेऊन अटक केली आहे. तर कुरेशी मोउद्दीन इसुफ राहणार खाटीक गल्ली श्रीगोंदा हा फरार झाला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार विठ्ठल बडे हे करत आहेत.
COMMENTS