मुंबई / नगर सहयाद्री - मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर अली आहे. मुंबई मधील लालबागच्या परिसरात कपाटात प्लास्टिकच्या पिशवीत भरून ठेवलेला मृत...
मुंबई / नगर सहयाद्री -
मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर अली आहे. मुंबई मधील लालबागच्या परिसरात कपाटात प्लास्टिकच्या पिशवीत भरून ठेवलेला मृतदेह सापडल्याची घटना घडली आहे. रात्री उशिरा पोलिसांना एका घरातून उग्र वास येत असल्याची माहिती प्राप्त झाली. तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास कार्य सुरु केले. घरातून येत असलेल्या उग्रवासाची तपासणी केली असता ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
वृत्त संस्थाच्या माहितीनुसार, लालबागच्या परिसरात इब्राहिम कासिम इमारतीच्या एका फ्लॅटमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही महिला बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या भावाने काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रार मिळाल्यानंतर पोलीस अधिकारी इमारतीत आले. त्यावेळी घरात शोध घेताना महिलेचा मृतेदह एका प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळला होता आणि तो सडलेल्या अवस्थेत होता.
दरम्यान या घटनेने परिसरात एकच खळबळ उडालेली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठवला आहे.या प्रकरणी या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी मृत महिलेच्या मुलीला ताब्यात घेतलं असून तिची चौकशी केली जात आहे
COMMENTS