मुंबई / नगर सहयाद्री - शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे या दोघांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर अश्लील मज...
मुंबई / नगर सहयाद्री -
शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे या दोघांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर अश्लील मजकूर लिहून व्हायरल करण्यात आला होता. याप्रकरणी शीतल म्हात्रे यांनी सोशल मीडियावरील 'मातोश्री' नावाच्या पेजबाबत तक्रार केली असून पोलिसांकडून गुन्हा दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटाला रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत आक्रमक होत म्हणाले या व्हिडिओशी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा संबंध नाही. तुमची पापं लपवण्यासाठी, गुन्हे लपवण्यासाठी, तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांवर हात टाकणार असाल तर ते कायद्याचं राज्य नाही. कोणीही व्हिडिओ काढून व्हायरलं करतं, याचा आमच्याशी संबंध नाही. पण सार्वजनिक कार्यक्रमात कोणीही अशाप्रकारचं अश्लील वर्तन करत असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाले पाहिजेत.
पुढे म्हणाले, व्हिडिओ खरा की खोटा याचा तपास करा. तो व्हिडिओ खरा असेल तर सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करुन समाजात चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्याचा तर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. यावर आता शिंदे गट आणि शीतल म्हात्रेंकडून काय प्रतिक्रिया येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
COMMENTS