अहमदनगर | नगर सह्याद्री सहकारमहर्षी स्व. सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेचा मागील २२ वर्षांचा प्रवास ठेवीदार, कर्जदारांसाठी मोठं बळ देणा...
अहमदनगर | नगर सह्याद्री
सहकारमहर्षी स्व. सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेचा मागील २२ वर्षांचा प्रवास ठेवीदार, कर्जदारांसाठी मोठं बळ देणारा आहे. स्व. गुंदेचा यांनी बँकिंगच्या माध्यमातून व्यापारी, उद्योजकांना पायावर उभं करण्याचं काम केलं, असे प्रतिपादन माजी महसूल मंत्री तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांनी केले.
नगर शहराच्या दौर्यावर आले असता त्यांनी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या नूतन वास्तूस सदिच्छा भेट दिली. मागील महिन्यात या वास्तूचे लोकार्पण पार पडले होते. यावेळी तब्येतीच्या कारणास्तव आ.थोरात उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे शहरात आले असता त्यांनी सदिच्छा भेट देत इमारतीची पाहणी करत शुभेच्छा दिल्या.
यावेळी आ.लहू कानडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे, पतसंस्थेचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक मनोज गुंदेचा, चेअरमन किरण शिंगी, व्हाईस चेअरमन विनय भांड, संचालक शांतीलाल गुगळे, विशाल गांधी, संकेत पोखरणा, प्रमोद डागा, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चोपडा, जैन धर्मशाळेचे अध्यक्ष राजेंद्र गांधी, अभिनय गायकवाड, सुजित क्षेत्रे, शंकर आव्हाड, प्रशांत जाधव, आकाश आल्हाट आदी उपस्थित होते.यावेळी मनोज गुंदेचा म्हणाले, सुवालालजी आणि आ.थोरात यांच्यात व्यक्तिगत ऋणानुबंध होता.
COMMENTS