धुळे नगर सह्याद्री ; शिरपूर तालुक्यातील एका पाड्यावर एक धक्कादायक घटना घडली असून काकानेच पुतणीवर अत्याचार केल्याने पुतणी गरोदर राहिली आहे. ...
धुळे नगर सह्याद्री ;
शिरपूर तालुक्यातील एका पाड्यावर एक धक्कादायक घटना घडली असून काकानेच पुतणीवर अत्याचार केल्याने पुतणी गरोदर राहिली आहे.
नात्याला काळीमा फासणारी हि घटना आहे . याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिसांत काकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घटनेनंतर काका फरार झाला असून पोलिसांनी त्याचा कसून शोध सुरू केला आहे.पीडितेच्या आईने शिरपूर तालुका पोलिसांना फिर्याद दिली. त्यानुसार, त्यांची मुलगी शेतात पाणी भरण्यासाठी व गायीला चारा कापायला गेली असता तेथे मुलीचा काका बाट्या चतुरसिंग पावरा (वय ४०) हा आला. त्याने तिला धमकी देवून तिच्यावर कपाशीच्या शेतात अत्याचार केला. चार महिन्यांपूर्वी ही घटना घडली. त्यामुळे पिडीतेला दिवस राहिले, त्यात तिचे पोट पुढे आल्याने तिच्या आईला शंका आली. त्यांनी मुलीला विश्वासात घेत विचारपूस केली असता हकीकत सांगितली. काकानेच अत्याचार केल्याचे सांगितल्याबरोबर कुटुंबियांना मोठा धक्का बसला.
COMMENTS