अहमदनगर। नगर सहयाद्री - आमदार नीलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्यात, शरद पवार म्हणाले यांनी कांद्याचे दर कोसळण्याला...
अहमदनगर। नगर सहयाद्री -
आमदार नीलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्यात, शरद पवार म्हणाले यांनी कांद्याचे दर कोसळण्याला केंद्र सरकारच्या योजना जबाबदार असल्याचे म्हटले आहे. तसेच कांद्याला योग्य भाव मिळायला हवा, असे म्हणत हा मुद्दा संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान उपस्थित करणार असल्याचेही ते म्हणाले.
आमदार नीलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभीष्टचिंतन सोहळ्यात, निघोज ग्रामीण पतसंस्थेचा रौप्यमहोत्सव, संस्थेचे बाबासाहेब कवाद नामकरण, आमदार लंके यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना सात हजार सायकलींचे वाटप, स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचे उद्घाटन खासदार पवार यांच्या हस्ते झाले.
शरद पवार म्हणाले, मी राज्याच्या काही भागात जाऊन आलो. महाराष्ट्रात ऊस हे महत्त्वाचे पीक आहे. उसाचे वजन कमी येत आहे. भावाची खात्री नाही. तीन दिवसांनी लोकसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. दिल्लीला गेल्यानंतर कांदा, ऊस तसेच शेतकऱ्यांचे अन्य प्रश्न यांची मांडणी संसदेत मांंडण्याची कामगिरी मी आणि माझ्या सहकाऱ्यांकडून केली जाईल
पवारांनी सांगितला कांद्यावरचा किस्सा
शरद पवार म्हणाले, मी कृषीमंत्री असताना एकदा कांद्याचे भाव वाढले म्हणत भाजपचे खासदार कांद्याच्या माळा घेऊन सभागृहात आले होते. सभापतींनी मला विचारले की, भाजपच्या खासदारांनी कांद्याचे भाव कमी करण्यासंदर्भात मागणी केली आहे. यावर तुम्ही मार्ग काढयला हवा. मी त्यांना स्पष्ट सांगितले की, मी याबाबत काहीही मार्ग काढणार नाही. कांदा हे जिरायत शेतकऱ्याचे पीक आहे. त्यातून त्याला दोन पैसे मिळतात. त्यांना दोन पैसे मिळाले, तर लगेच कांद्याच्या माळा घालून निषेध करण्याचे काम सुरू आहे. त्याला माझा पाठिंबा नाही. तुम्ही माझा निषेध करा किंवा माझ्या विरोधात घोषणा द्या. कांद्याची किंमत कमी होईल, असा एकही निर्णय मी घेणार नाही.
शरद पवार म्हणाले, कांद्याचे भाव वाढले म्हणून दंगा करणारे लोक आता कांद्याकडे बघायला तयार नाहीत. आज एक एकर कांद्याच्या बियाण्याला 10 हजार, लागवडीला 15 हजार खुरपणीला 8 हजार, खते आणि औषधांना प्रत्येकी 12 हजार, कांदा काढणीला 14 हजार, मशागत असा हा सर्व खर्च बघितला, तर 70 हजारांपेक्षा जास्त खर्च शेतकऱ्याला येतो. म्हणजे शेतकऱ्याला प्रतिकिलोमागे 8 ते 10 रुपये खर्च येतो. अशावेळी त्यांना बाजारात 3 ते 4 रुपये प्रती किलोने भाव मिळत असेल तर शेतकऱ्यांनी आत्महत्या करायची काअसा सवाल पवारानी सरकारल केला आहे.
COMMENTS