स्व.दिलीपराव ठुबे यांनी सुरू केलेली परंपरा कायम / ३१ मार्च रोजीच ताळेबंद जाहीर टाकळी ढोकेश्वर / नगर सह्याद्री - सहकार क्षेत्रात अग्रगण्य अ...
स्व.दिलीपराव ठुबे यांनी सुरू केलेली परंपरा कायम / ३१ मार्च रोजीच ताळेबंद जाहीर
टाकळी ढोकेश्वर / नगर सह्याद्री -
सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणा-या कान्हुर पठार (ता.पारनेर) येथील कान्हूर पठार पतसंस्थेने स्व.दिलीपराव ठुबे यांनी सुरू केलेली परंपरा कायम ठेवत ३१ मार्च रोजीच आर्थिक पत्रके जाहीर केले आहे.
या आर्थिक वर्षात संस्थेस 12 कोटी 35 लाख रूपयांचा नफा ढोबळ नफा झाला आहे. सर्व तरतुदी वजा जाता निव्वळ नफा 3 कोटी 23 लाख रूपयांचा झाला असल्याची माहीती संस्थेच्या अध्यक्षा सुशिला ठुबे व कार्यकारी संचालिका नमिता ठुबे यांनी दिली.
उपाध्यक्ष पी.के.ठुबे म्हणाले, संस्थेने 450 कोटी ठेवींचा टप्पा पार करत मार्च अखेर संस्थेकडे 469 कोटी रूपयांच्या ठेवी आहेत. तसेच चालु वर्षात 43 कोटी रुपयांची वाढ आहे. विविध बँकातील गुंतवणूक 193 कोटी रूपयांची आहे. संस्थेने तरलतेचे प्रमाण योग्य पद्धतीने राखले आहे. त्यापेक्षा अधिक गुंतवणूक करण्यात आली आहे.
संस्थेच्या आर्थिक स्थिती विषयी माहीती देताना कार्यकारी संचालिका नमिता ठुबे म्हणाल्या,
वरील आर्थिक बाबींचा विचार करता संस्थेच्या सभासदांनी ठेवीदार कर्जदार यांनी संस्थेवर मोठ्या प्रमाणात विश्वास दाखवला आहे.
संस्थेकडे कोटी ▪️ 53 कोटी रूपयांचा स्वनिधी आहे.
संस्थेच्या विविध शाखांमधुन 363 कोटी रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.
संस्थेने ग्राहकाभिमुख सेवा देताना बदलत्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून कोअर बँकिंग सेवा उपलब्ध करून दिली आहे.
त्यानुसार संस्थेने ग्राहकांना आरटीजीएस, एसएमएस सेवा सर्व शाखांमधुन ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहे. यासोबत लाईट बिल भरणा, मोबाईल व डीश टीव्ही रीचार्ज या सेवाही उपलब्ध करून दिल्या आहेत.
सुरक्षेतेला अधिक महत्व देत संस्थेने स्वतःचे डाटा सेंटर सुरू केले आहे. लवकरच युपीआय कोड द्वारे खात्यात पैसे ही सुविधाही सुरू करणार आहोत.
संस्थेच्या ▪️ 12 शाखांच्या इमारती स्वमालकीच्या आहेत. संस्थेचे खेळते भांडवल 715▪️ कोटी रूपयांचे आहे. अशा प्रकारे संस्थेची आर्थिक परिस्थिती अतिशय सक्षम आहे. त्यामुळे संस्थेचे आर्थिक व्यवहार दिवसेंदिवस वाढत असुन संस्था प्रगतीपथावर आहे.
यावेळी संचालक सुभाष नवले, राजेंद्र व्यवहारे,
सुहास शेळके, भास्कर ठुबे, मधुकर साळवे, संपत खरमाळे,भोमा ठुबे, राजेंद्र रोकडे, भगवान वाळुंज, गवराम गाडगे, पो.मा.झावरे, दादाभाऊ नवले, मंगेश गागरे उपस्थित होते.
COMMENTS