गटेवाडीत कन्हैया अॅग्रोच्या प्रकल्पाचे उपमुख्यमंत्री फडणवीस हजारेंच्या हस्ते उद्घाटन / पशुखाद्याबरोबर पोल्ट्री खाद्याचे उत्पादन शरद झावरे / ...
गटेवाडीत कन्हैया अॅग्रोच्या प्रकल्पाचे उपमुख्यमंत्री फडणवीस हजारेंच्या हस्ते उद्घाटन / पशुखाद्याबरोबर पोल्ट्री खाद्याचे उत्पादन
शरद झावरे / नगर सह्याद्री -
कन्हैया अॅग्रोने पारनेर सारख्या ग्रामीण भागात दूध धंद्याच्या माध्यमातून धवल क्रांती केली असून पशुखाद्य उत्पादनात सुद्धा मोठ्या प्रमाणावर भरारी घेतली आहे. त्यामुळे यापुढील काळात सुद्धा कन्हैया अॅग्रोने महाराष्ट्रात दर्जा टिकवण्याचे काम केले असून दर्जेदार उत्पादनाचा ठसा महाराष्ट्रात निर्माण केला असल्याचे गौरवोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गटेवाडीत केले आहे. तर दुसरीकडे शेतीमधून दर्जेदार उत्पादनासाठी राज्यात २५ लाख हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक शेतीचा नवीन प्रयोग राज्य सरकार लवकरच राबविणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन तंत्रज्ञान व योजना राबविण्यासाठी सुद्धा सरकार प्रयत्नशील असून कन्हैया अग्रोने दर्जेदार उत्पादनाचा आपला ठसा या पुढील काळातील कायम ठेवावा असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पारनेर तालुक्यातील कन्हैया अॅग्रो च्या गटेवाडी येथील नुतन प्रकल्पाचे शनिवारी११ मार्च रोजी दुपारी १ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पद्मभूषण अण्णा हजारे महसूल पोपटराव पवार पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, शाताराम लंके, अमुल डेअरीचे बाळासाहेब भोसले, उद्योजक मच्छिंद्र लंके, सुरेश पठारे, अभय औटी, लिबेश नायर, विठ्ठल पवार, नितीन आडसुळ, जिल्हाधिकारी सिध्दीराम सालीमठ, राहुल शिंदे, अश्विनी थोरात, विश्वनाथ कोरडे, तालुकाध्यक्ष वसंतराव चेडे, बाळासाहेब नरसाळे यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की
कन्हैया अॅग्रो अभिनंदन करेल की एक विस्तारीर प्रकल्पाचे लोकार्पण करून दमदार पाऊल टाकले आहे. सुरेश पठारे मेहनती असुन लंके कुटुंबियांच्या अनुभवाचा फायदा हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होणार आहे. शेतकऱ्यांना पशुधनाच्या माध्यमातून स्थैर्य मिळते. त्यामुळे शेतीला मदत करण्यासाठी पशुधन काम करत आहेत. दुधाची वाढती मागणी व दुध जनावरांना अधिक पोषक आहार देवुन दुध क्षमता वाढवणे आवश्यक आहे. जंगलामध्ये पुरेशा चारा उपलब्ध होत नाही. जनावरांना आवश्यक पोषक द्रव्ये महत्वाचे हे देण्याचे काम कन्हैया अॅग्रो करत आहेत. आज अनेक कंपन्या बोगस उत्पादने करत असुन छापले एक व आतमध्ये एक आहे. पशुधना शिवाय आपल्याला पर्याय नाही जग व शेती वाचवायचे असेल तर २५ लाख हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक शेती नवीन प्रयोग केले जात आहे.
गोवंश वाढला पाहिजे संवर्धन झाले पाहिजे, यासाठी सरकार काम करत आहेत. शेतीचे नवीन तंत्र विकसित केले जात आहे. शेतकऱ्यांना जे फायदा झाला पाहिजे यासाठी पशुखाद्य जास्तीत जास्त दर्जेदार झाले पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पशुखाद्याची बाबत नवीन मिशन राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून राबविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबविण्यासाठी
१ रुपयांत विमा शेततळे विहीर व इतर अनेक योजना
राजकारण चांगल्या कामावर हावी होत आहे. जलयुक्त शिवार अभियान गाळमुक्त धरण यासाठी दुसरा टप्पा आता सुरु करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्य सरकार शेतकरांच्या पाठीशी आहे. कारण शेती टिकली तर देश टिकेल त्यामुळे शेतकरांसाठी नवीन धोरण सरकार आणत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले की
सहकारी यांनी कन्हैया अॅग्रो जो सुरू केला आहे तो शेतकरी वर्गासाठी महत्वाचा आहे. ३०० लीटर पासुन ७ हजार लीटर दुधस़ंकलन हे दररोज शेतकरांसाठी महत्वाचे आहे. मी देवेंद्र फडणवीस यांना याबाबत अधिक काही सांगणार नाही ते मागण्यांबाबत योग्य ते निर्णय घेतील असे ही अण्णा हजारे म्हणाले.
यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की शांताराम लंके या उद्योगाचे आधारवड असुंन पाया पक्का रोवलेल्या आहे. एक साधा शेतकरी काय करू शकतो याचे उदाहरण म्हणजे कन्हैया अॅग्रो व उद्योग समूह आहे.राज्यामध्ये साडे तीन कोटी संकलन होते. परंतु पशुखाद्याची निर्मिती होत नाही. पशुखाद्याच्या गुणवत्ता बाबत मोठ्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. राज्य सरकार पुढे दुध भेसळ व पशुखाद्य भेसळ मोठे आवाहन आहे. परंतु कन्हैया अॅग्रो याला अपवाद असुन आदर्श काम या क्षेत्रात करत आहेत. हा व्यवसाय सहकाराच्या माध्यमातून चालू होता. परंतु अमुल मदर डेअरी सारखे खाजगी प्रकल्प महाराष्ट्रात आले. त्यामुळे स्पर्धा निर्माण झाली दुध धंद्याल चांगले दिवस आले. विक्रमी दर सध्या शेतकऱ्यांना मिळत आहे. भेसळ पासुन आपल्या लोकांना मुलाबाळांना विष पाजत आहे. त्यामुळे दुधव्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. आदर्श योजना ही शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नामदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
यावेळी सुरेश पठारे म्हणाले की प्रकारची व्यावसायिक पाठ पार्श्वभूमी नसताना आम्ही २०१५ साली सुरुवातीला पारनेर अहमदनगर जिल्ह्यात असलेला हा आमचा व्यवसाय आज महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यापर्यंत आम्ही घेऊन गेलेलो कारखाना आणि त्यानंतर आज हा प्रकल्प अत्याधुनिक ५० कोटी रुपयांची गुंतवणूक या प्रकल्पा साठी करणार आहे. आपल्या कार्यकाळात एक खिडकी जी योजना चालु केली होती त्याचा फायदा आम्हाला हा प्रकल्प उभारण्यासाठी झाला आहे. अर्थ संकल्प जो सादर केला तो उद्योग धंदा साठी महत्वाचा आहे. कन्हैया अॅग्रो ने पशुखाद्यात अनेक नवनवीन संशोधन करून नविन उत्पादने निर्माण करून राज्यभरातील दुध उत्पादकांना आपले दुध वाढविण्यासाठी फायद्याचे ठरले आहे. गटेवाडी येथील प्रकल्पाची २०१७ साली सुरवात करण्यात आली होती. आज त्याचे मोठे स्वरूप झाले असुन प्रतीमहीना ८ हजार मॅट्रिक टन उत्पादन सध्या या प्रकल्पातुन बाहेर पडत आहे. आता नव्याने होणारा प्रकल्प अत्याधुनिक असुन यामुळे प्रति महिना उत्पादना मध्ये ९ हजार मॅट्रिक टन वाढ होणार असुन एकुण उत्पादन १७ हजार मॅट्रिक टन होणार आहे. या प्रकल्पामुळे तालुक्यातील रोजगाराला चालना मिळाली असुन विविध गावातील एकुण ६०० कर्मचारी येथे काम करत आहेत. गुणवत्ता जपल्याने सुरवातीला पारनेर परिसर आणि नगर जिल्ह्यात असलेली पशुखाद्याची मागणी पुढे राज्याभरातुन होत आहे. दुध व्यवसायाच्या बरोबरच पोल्ट्री उद्योग एक पुरक व्यवसाय म्हणुन पुढे येत असल्याने कंपनीने पोल्ट्री खाद्याचे उत्पादन सुरू केले आहे. पशुखाद्या प्रमाणे या उत्पादनाला राज्यभरातील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या बाजारात विविध नांमकित कंपनीचे पशुखाद्य उपलब्ध आहे. त्यांच्या तुलनेत बाजारातील स्पर्धेत टिकवण्यासाठी लागणारा दर्जेदारपणा कायम ठेवल्याने कन्हैया अॅ ग्रो च्या पशुखाद्याला राज्य परराज्यात मागणी वाढली आहे.
हजारेंकडुन उपमुख्यमंत्री फडणवीस, नामदार विखे पाटलांवर पुष्पवृष्टी ..
पारनेर तालुक्यातील गटेवाडी येथील कन्हैया अॅग्रोच्या नूतन प्रकल्पाच्या उत्पादन उद्घाटन प्रसंगी जे समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर पुष्पृष्टी केली. तर सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असतानाही अनेक महिन्यापासून अण्णांशी फक्त फोनवर बोलणे होते, अण्णांची प्रतीक्षा भेट झाली नाही. त्यामुळे सुरेश पठारेच्या आमंत्रण सत्कार स्वीकार करत अण्णांना भेटण्यासाठी सुद्धा मी या कार्यक्रमासाठी आलो असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
COMMENTS