मंगेश मुळे / नगर सह्याद्री - पारनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील समजल्या जाणाऱ्या देवीभोयरे गावच्या उपसरपंच पदी दत्...
मंगेश मुळे / नगर सह्याद्री -
पारनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील समजल्या जाणाऱ्या देवीभोयरे गावच्या उपसरपंच पदी दत्तात्रय शंकर मुळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. फेब्रुवारी २०२१ मध्ये देवीभोयरे गावची ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. त्या निवडणूकित राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित जगदंबा ग्रामविकास पॅनलने १०/१ असा दणदणीत विजय मिळवत ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकविला. त्यावेळी उपसरपंच पदासाठी प्रत्येकी एक वर्ष याप्रमाणे संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार मावळते उपसरपंच सौ. सुलोचना वाढवणे यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यांनतर सरपंच विठ्ठलशेठ सरडे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची बिनविरोध निवड पार पडली. सर्वानुमते युवा नेतृत्व दत्तात्रय मुळे यांना संधी देण्यात आली.
उपसरपंच पदाची निवड झाल्यानंतर या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून, सर्वाना बरोबर घेऊन विकासकामे करण्याची ग्वाही नवनिर्वाचित उपसरपंच दत्तात्रय मुळे यांनी दिली. याप्रसंगी सरपंच विठ्ठलशेठ सरडे, माजी पंचायत समिती सदस्य व सोसायटी चेअरमन सुभाषराव बेलोटे, व्हा. चेअरमन प्रकाश मोरे, ग्रामपंचायत सदस्य अशोकराव मुळे, संपतराव वाळुंज , शंकर सरडे, सुलोचना वाढवणे, राधाबाई घोरपडे, रोहिणी मुळे, दीपाली बेलोटे, शितल बेलोटे, जगदंबा पतसंस्थेचे चेअरमन तुकाराम बेलोटे, व्हा. चेअरमन शिवाजीराव बेलोटे, अनिल बेलोटे, विठ्ठल बेलोटे, विठ्ठल नाना सरडे, सोसायटी संचालक बाळासाहेब बेलोटे, गीताराम जानकर, मंगेश मुळे, वसंत गायकवाड, गणेश बेलोटे ,फक्कड मुळे, ग्रामविकास अधिकारी नागवडे भाऊसाहेब, गावातील सर्व संस्थाचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीबद्दल आमदार निलेश लंके, जि. परिषद सदस्य राणिताई लंके यांनी शुभेच्छा दिल्या. ग्रामपंचायत सदस्य शंकर सरडे यांनी आभार मानले.
COMMENTS