बाजार समितीसाठी राष्ट्रवादीची आढावा बैठक संपन्न शरद झावरे / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेस व निलेश लंके प्रतिष्ठानचे कार्यकर्ते...
बाजार समितीसाठी राष्ट्रवादीची आढावा बैठक संपन्न
शरद झावरे / नगर सह्याद्री -
राष्ट्रवादी काँग्रेस व निलेश लंके प्रतिष्ठानचे कार्यकर्ते एकदिलाचे व एकजीवाचे असून रसद बिसद काही नसते आगामी निवडणुकीत या रसदवाल्यांना आपण घरी पाठविणार असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी भाजपाचे खासदार सुजय विखे पाटील यांचे नाव न घेता केला. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या हितासाठी ही बाजार समितीवर सत्ता मिळवायची. नाशिक, निफाड बाजार समितीच्या धर्तीवर पारनेर बाजार समिती करायची असल्याचा मानस आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केला आहे.
बाजार समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची आढावा बैठक मंगळवारी दुपारी संपन्न झाली असून यावेळी ज्येष्ठ नेते किसनराव रासकर, अशोक सावंत, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, खंडु भुकन, मारूती रेपाळे, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, प्रशांत गायकवाड, नगराध्यक्ष विजय औटी, माजी सभापती सुदाम पवार, कारभारी पोटघन मेजर, बा.ठ.झावरे, दिपक लंके, दादा शिंदे, रा. या औटी, डॉ बाळासाहेब कावरे, बबलू रोहकले, राहुल झावरे, विजय पवार, सचिन पठारे, किरण पठारे, अनिल गंधाक्ते, भागुजी दादा झावरे, सखाराम औटी, भाऊसाहेब भोगाडे सर, बाळासाहेब पुंडे, बाळासाहेब खिलारी, शिवाजी लंके, शिवाजी बेलकर, प्रा संजय लाकुडझोडे, नंदकुमार देशमुख, किरण ठुबे, भागाजी गावडे, राजेंद्र शिंदे, सरपंच गुंडा भोसले, दौलत गांगड, संदीप मगर, नगरसेवक भुषण शेलार, सुभाष शिंदे, सरपंच पियुष गाजरे, अजित भाईक, सरपंच संजय रोकडे, सरपंच बाजीराव दुधाडे, दादाभाऊ रोकडे, पोपटराव साळुंके, रावसाहेब बर्वे, सुदाम शिर्के, सत्यम निमसे यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार निलेश लंके म्हणाले की, बाजार समिती निवडणुकीसाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. निवडणूक महत्वाची आहे. शेतकरांशी ही निगडित निवडणूक आहे. आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती. परंतु यावेळी १८ जागा पुर्ण क्षमतेने निवडुन आणण्याची जबाबदारी आहे. प्रत्येक गावाला गटाला व वर्गाला संधी कशी देता येईल यादृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत मतदारसंघातील निवडणूक महत्वाची आहे.
सगळ्यांना बरोबर घेवून सर्व समावेशक चर्चा करून निर्णय घेणे अपेक्षित आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हा परिवार आहे. त्यामुळे आनंदाने व एक विचाराने आवश्यक आहे. अनेक अनुभवी व दिग्गज माणसे आपल्या बरोबर असुंन यांचा फायदा आपण घेतला पाहिजे. शंकाकुशंकाना वाव न देता आपण सर्वांना बरोबर घेऊन काम घेवून येणार आहे. तर या निवडणुकीत रसद बिसद काय नसते. आपण एक जीवाचे आहे हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे रसद वाल्यांना आपण घरी पाठविणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी ही बाजार समिती निवडणुक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. निवडणुकीत वैयक्तिक मतभेद राजकारणात गावागावात भावकीत वाद ठेवले नाही पाहिजे अशी अपेक्षा आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केली आहे. या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रक्रियेतून ज्याचा उमेदवारी अर्ज तो ग्राह्य धरण्यात येईल परस्पर उमेदवारी अर्ज दाखल केला तर राष्ट्रवादी बेदखल करणार असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले आहे. या निवडणुकीत जरी संधी मिळाली नाही तर आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूकीत संधी दिली जाईल. महाविकास आघाडी काँग्रेस ठाकरे गटाला बरोबर घेवून निवडणूक लढवणार आहेत.शिवसेना ठाकरे गटातील कोणी इच्छुक असेल त्यांना संधी द्यावी लागेल. त्यामुळे कोणाला तालुक्यातील वातावरण जर संघर्षशील ठेवायचे असेल तर आपण काय करू शकतो. त्यामुळे महाविकास आघाडी घटक पक्षांना बरोबर घेवून निवडणूक लढविणार असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले. त्यामुळे मोठ्या मताधिक्याने ही बाजार समितीची निवडणूक आपल्याला लढवायची असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले.
व्यापारी मतदारसंघातून जातीपातीचे राजकारण होता कामा नये : अशोक सावंत, बाबाजी तरटे
व्यापारी मतदारसंघातून मारवाडी समाजाचे दोन्ही प्रतिनिधी हे निवडून येत आहे. त्यामुळे यापुढील काळात व्यापारी मतदारसंघातील उमेदवारीत बहुजन समाजातील उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. हे यासाठी या व्यापारी उमेदवारांना इतर उमेदवार निवडून आणण्यासाठी बांधुन घेतले पाहिजे असे अशोक सावंत, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, बाळासाहेब खिलारी यांनी सांगितले. व्यापारी मतदारसंघातील निवडणूक गुंतागुंतीची झाली आहे. परंतु आगामी निवडणुकीत त्यामध्ये दुरुस्ती महत्वाची असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले आहे.
COMMENTS