फोटो ओळी - पारनेरचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्राचे प्रशस्तीपत्र प्रदान करताना पोलिस महानिरीक्षक...
फोटो ओळी - पारनेरचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्राचे प्रशस्तीपत्र प्रदान करताना पोलिस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, अप्पर पोलीस अधीक्षक ज्योती भोर, पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव.(छाया / शरद झावरे)
पोलीस महानिरीक्षक, एसपींनी केले प्रशस्तीपत्रक प्रदान
सीसीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये उत्कृष्ट कामगिरी, जिल्ह्यामध्ये द्वितीय क्रमांक
पारनेर | नगर सह्याद्री -
पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर व जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सी. सी. टी. एन. एस. कार्यप्रणाली मध्ये उत्कृष्ट कामगिरी करून अहमदनगर जिल्ह्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली असून आपले काम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार महानिरीक्षक बी.जी.शेखर यांनी व्यक्त केले आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र, नाशिक डॉ. बी.जी. शेखर पाटील यांनी प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, अप्पर पोलीस अधीक्षक ज्योती भोर, पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान करण्यात आला.
यावेळी पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर म्हणाले की पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या कामगिरीबद्दल आपले विशेष अभिनंदन. भविष्यात आपण अशीच उल्लेखनीय कामगिरी करुन पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्यात मोलाची कामगिरी कराल ही अपेक्षा व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा! देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील सर्व अधिकारी उपस्थित होते.
COMMENTS