निघोज | नगर सह्याद्री - पारनेर तालुयातील लोणी मावळा येथे बिबट्याने १० शेळ्यांचा फडशा पाडला. या घटनेमुळे लोणी मावळा परिसरात घबराटीचे वातावरण...
निघोज | नगर सह्याद्री -
पारनेर तालुयातील लोणी मावळा येथे बिबट्याने १० शेळ्यांचा फडशा पाडला. या घटनेमुळे लोणी मावळा परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झालेे आहे.
याबाबत माहिती अशी, की लोणी मावळा येथील पडवळ मळा येथील सामाजिक कार्यकर्ते व लोणी मावळा गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष पुरुषोत्तम उर्फ बाळासाहेब तुकाराम शेंडकर यांच्या दहा शेळ्या घरांमध्ये बांधलेल्या होत्या. या शेळ्यांवर रात्री सुमारे बारा ते एकच्या दरम्यान घराच्या भिंतीच्या मोकळ्या असलेल्या बाजूने बिबट्याने घरात प्रवेश करत शेळ्यांचा फडशा पाडला.
सर्व शेळ्यांच्या नरड्याला चावा घेऊन शेळ्या मारून टाकल्या. रात्री वारा, पाऊस व विजेचा कडकडाट असल्याने विद्युत पुरवठा बंद झाला. दरम्यान बिबट्याने घरात प्रवेश केला. वारा व पाऊस यांच्या आवाजाने घरातील मंडळींना शेळ्यांचा आवाज आला नाही. सकाळी उठल्यावर शेळ्या बाहेर बांधण्याकरता घरातील महिला गेली असता शेळ्या मयत झाल्याचे लक्षात आले.
या बाबतची माहिती सरपंच वंदना मावळे व सामाजिक कार्यकर्ते देवराज शेंडकर यांनी वन विभागाला दिली. वन विभागाचे अधिकारहरिभाऊ आठरे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत मिळून देण्यास सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले. बिबट्याच्या भीतीने परिसरात घाबरट निर्माण झाली असून वन विभागाने परिसरात पिंजरा लावण्याची मागणी लोणी मावळा गावचे चेअरमन स्वप्निल मावळे व संतोष शेंडकर यांनी केली.
COMMENTS