काकणेवाडीत विविध विकास कामांचा शुभारंभ पारनेर | नगर सह्याद्री सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये अनितीचे राजकारण चालू असून बदलत्या राजकीय घडामोडीं...
काकणेवाडीत विविध विकास कामांचा शुभारंभ
पारनेर | नगर सह्याद्री
सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये अनितीचे राजकारण चालू असून बदलत्या राजकीय घडामोडींमुळे वातावरण गढुळ झाले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत हा गाळ दूर करण्याची जबाबदारी मतदारांसह कार्यकर्त्यांची आहे असे प्रतिपादन माजी आमदार विजय औटी यांनी काकणेवाडी येथे केले.
तालुयातील काकणेवाडी येथील जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काकणेवाडीची संरक्षक भिंत व शाळा खोल्या दुरुस्ती करणे, ओपन जिम साहित्य बसवणे या कामांचे लोकार्पण व विविध कार्यकारी सेवा सोसायटी संचालकांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल तसेच ढोकेश्वर पाणी वापर संस्था संचालकांचा सत्कार माजी आमदार विजय औटी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हा परिषद बांधकाम व कृषी समिती माजी सभापती काशिनाथ दाते कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे, महिला आघाडी प्रमुख प्रियंका खिलारी, उपतालुका प्रमुख पंढरीनाथ उंडे, साहेबराव वाफारे, शिवाजी खिलारी, सुभाष ठाणगे, डॉ. प्रदीप दाते, अक्षय गोरडे, बाबा नर्हे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सरपंच आदीका वाळुंज, उपसरपंच बाळासाहेब पवार, किसन वाळुंज, प्रदीप वाळुंज, भास्कर वाळुंज, रामदास वाळुंज, पोपट वाळुंज, हरिभाऊ वाळुंज, श्रीधर वाळुंज, सोन्याबापू वाळुंज, भाऊसाहेब वाळुंज, बाबासाहेब पुरी, शोभा औटी, कविता वाळुंज, भिकाजी वाळुंज, संदीप वाळुंज, ज्ञानदेव वाळुंज,कोंडीभाऊ वाळुंज, ग्राम. सदस्य कमल वाळुंज, अश्विनी वाळुंज, प्रतिभा वाळुंज, कल्याणी वाळुंज, द.पा.वाळुंज, विठ्ठल वाळुंज, दत्तात्रय नवले, साहेबराव नवले, रघुनाथ वाळुंज, बाबासाहेब वाळुंज, रावसाहेब वाळुंज, बाबाजी वाळुंज, अर्जुन वाळुंज, सपंत वाळुंज, विष्णू वाळुंज, मारुती वाळुंज, किशोर वाळुंज, श्रीकृष्ण वाळुंज, विनायक वाळुंज, राजेंद्र वाळुंज, नामदेव वाळुंज, सुनिल वाळुंज, बबन वाळुंज,संतोष पवार,अभिषेक वाळुंज,मचिंद्र वाळुंज, महेश वाळुंज, भगवान वाळुंज, रावसाहेब वाळुंज, दत्तात्रय वाळुंज, सुशांत वाळुंज, सोपान वाळुंज, नारायण वाळुंज, बाबासाहेब वाळुंज, सचिन बोऋडे, मधुकर झावरे उपस्थित होते.
यावेळी बोलताना औटी म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्याबाबत सार्या महाराष्ट्रात आदराची भावना आहे. तयारीला लागा मैदान जवळ आहे, तुमच्या मनातलं जे आहे २०२४ ला घडणार आहे. लोकांच्या मनात प्रचंड खदखद आहे.या देशाच्या लोकशाहीचे भवितव्य काय असेल, या प्रश्नाबाबत सर्वत्र व्याकुळता दिसते. सार्या व्याकुळतेच्या पार्श्वभूमीवर गीताराम वाळुुंज सारखे सामाजिक काम करणारे कार्यकर्ते जेव्हा समाजाला देणगी सारखे मिळतात, मी समजतो काकडेवाडीचे भाग्य आहे. महाराष्ट्राचे राजकारण गढुळ झाले आहे, हा सगळा गाळ उद्याच्या निवडणुकीत आपल्याला दूर करावा लागेल. माजी सरपंच गीताराम वाळुंज यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला.यावेळी डॉ. पठारे, प्रियांका खिलारी, पंढरीनाथ उंडे, सुभाष ठाणगे, निवृत्ती वाळुंज, जयवंत वाळुंज, विष्णू वाळुंज यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप वाळुंज यांनी केले तर सर्वांचे आभार सरपंच सौ. आदिका वाळुंज यांनी मानले.
तरुण सरपंचाने गावचा
चेहरा मोहरा बदलला
गावातील विकास कामाबाबत पाठपुरावा व विकास कामे कशी करून घ्यावी याची हातोटी माजी सरपंच गीताराम वाळुंज यांच्याकडे आहे. कामासाठी धडपडणारा, गावच्या विकासात, जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा उचलणारा, हाडाचा कार्यकर्ता गीताराम वाळुंज गेल्या दहा ते बारा वर्ष सातत्याने संपर्कात आहे. विकासासाठी या गावची मंडळी सातत्याने एकत्र राहिली. या गावात जलसंधारणाची खूप मोठी कामे झाली. माझ्या माध्यमातून जवळपास एक कोटी रुपयांची कामे मार्गी लागली हे सर्व श्रेय तुम्हा सर्वांचे आहे असे माजी सभापती काशिनाथ दाते म्हणाले.
COMMENTS