दिल्ली नगर सह्याद्री रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी भारत सातत्याने प्रयत्नशील आहे. युरोपमधील रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याच्या भारताच्या...
दिल्ली नगर सह्याद्री
रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी भारत सातत्याने प्रयत्नशील आहे. युरोपमधील रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याच्या भारताच्या प्रयत्नाचं नोबेल पारितोषिक समितीने कौतुक केलं आहे. नोबेल समितीचे उपनेते अॅस्ले टोजे यांनी भारताचं कौतुक केलं आहे. त्यांनी मोदींच्या पाठीवर कौतुकाची थापही दिली आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्धासंदर्भात ज्या पद्धतीने रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना समजावून सांगितलं ते कौतुकास्पद आहे. त्यांनी कोणतीही धमकी न देता आण्विक युद्धाच्या परिणामांबद्दल कठोर संदेश दिला, आंतरराष्ट्रीय राजकारणात आपल्याला अशाच नेत्यांची गरज आहे, असं म्हणत नोबेल समितीचे उपनेते तोजे यांनी कौतुक केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नोबेल शांतता पुरस्काराचे दावेदार असू शकतात.ते शांतता प्रस्थापित करु शकतात तसेच पंतप्रधान मोदी हे जगातील मोठ्या राजकारण्यांपैकी एक आहेत आणि ते शांततेसाठी मोठे योगदान देत आहेत.टोजे म्हणाले की, मला आनंद आहे मोदी केवळ भारताला पुढे नेण्याचं काम करत नाहीत तर शांततेसाठी महत्त्वाच्या मुद्द्यांवरही काम करत आहेत.जगाने भारताकडून शिकण्याची गरज आहे.भारत महासत्ता होणार हे निश्चित आहे.स्वीडिश शास्त्रज्ञ अल्फ्रेड बर्नार्ड नोबेल यांच्या स्मरणार्थ नोबेल फाऊंडेशनतर्फे नोबेल पुरस्कार दिला जातो. नोबेल फाऊंडेशनची स्थापना 29 जून 1900 रोजी झाली आणि नोबेल पारितोषिक 1901 पासून देण्यात येत .
COMMENTS