मुंबई । नगर सह्याद्री - मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. लोकल एका दिव्यांग व्यक्तीसाठी जीवघेणी ठ...
मुंबई । नगर सह्याद्री -
मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. लोकल एका दिव्यांग व्यक्तीसाठी जीवघेणी ठरली आहे. धावत्या रेल्वेत एका गर्दुल्ल्याने दिव्यांग व्यक्तीला जाळण्याचा प्रयत्न केला आहे.
पीडित व्यक्तीवर सध्या केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकारानंतर लोकलमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हे धक्कादायक कृत्य करणाऱ्या आरोपीचा ठाणे रेल्वे पोलिसांकडून सध्या शोध सुरु आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, धावत्या रेल्वेत प्रवाशाला जीवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रमोद वाडेकर (वय 35) असं या अपंग प्रवाशाचे नाव आहे.
हा प्रवासी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण लोकलमध्ये अपंग व्यक्तिच्या डब्यातून प्रवास करत होता. लोकल कळवा मुब्रा स्थानकात येताच एका गर्दुल्यानं त्याच्यासोबत वाद घातला आहे.
त्यानंतर रुमालाला आग लावून तो रुमाल या प्रवाशाच्या अंगावर फेकला. या घटनेत हा प्रवासी जखमी झाला. या प्रकरणातील संशयीत आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती रेल्वे लोहमार्ग पोलिसांकडून देण्यात आली आहे.
COMMENTS