मुंबई । नगर सह्याद्री - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांचे विश्वासू नेते आणि मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांना जीवे ...
मुंबई । नगर सह्याद्री -
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांचे विश्वासू नेते आणि मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मुंब्रा डोंगरावर असलेला अनधिकृत दर्गा आणि मशिदीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या अविनाश जाधव यांना ही धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंब्रा डोंगरावर असलेला अनधिकृत दर्गा आणि मशिदीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या अविनाश जाधव यांना ही धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणातल्या धमकीचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर ठाण्यातील महाराष्ट्र सैनिक आक्रमक झाले असुन या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात अज्ञातां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अविनाश जाधव यांच्या धमकीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हम उसे जिंदा नही छोडेंगे, कोई गुस्ताख छुप न पाएगा, हम उसे ढुंड ढुंढ के मारेंगे” अशी धमकी या व्हायरल व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे. या धमकीनंतर महाराष्ट्र सैनिक संतप्त झाले असून मनसे ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
COMMENTS