मुंबई । नगर सह्याद्री - राज्याचे राजकारण सध्या चांगले तापले आहे. उद्धव ठाकरे यांची आज मालेगाव येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. महाविकासआघा...
मुंबई । नगर सह्याद्री -
राज्याचे राजकारण सध्या चांगले तापले आहे. उद्धव ठाकरे यांची आज मालेगाव येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. महाविकासआघाडीच्या या दोन्ही कार्यक्रमांवर सत्ताधाऱ्यांकडून टीका केली जात आहे.
मालेगावात उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी उर्दूतील बॅनर झळकले आहे. यानंतर भाजप आणि शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली जात आहे. या टीकेला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो पोस्ट करत प्रत्युत्तर दिले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा प्रश्न खरं तर त्यांना विचारायला हवा. उर्दू ही देखील एक भाषा आहे आणि आमचा त्याला विरोध नाही. आमचा विरोध हा लांगुनचालनाला आहे. याच उत्तर त्यांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना द्यावे लागेल, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.
त्यांच्या टीकेला उत्तर देताना शिवसेना नेते आंबादास दानवे यांनी फेसबूकवर फडणवीसांचा एक फोटो पोस्ट केला आहे. यात फडणवीस मुस्लीम बांधवांच्या कार्यक्रमात बोलताना दिसत आहे. या फोटोला आंबादास दानवे यांनी 'जिनके घर शीशे के बने होते हैं वो दूसरों पर पत्थर नहीं फेंकते...' असे कॅप्शन देत फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
शिवसेनेकडून करण्यात आलेल्या टीकेलाही आंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दानवे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंच एक उर्दूतील पोस्टर फेसबूकवर पोस्ट केले आहे. जनाब एकनाथ शिंदे ये भी देख लो…. असे कॅप्शन देत त्यांनी आधीत हे पाहा आणि नंतर उध्दवसाहेबांवर टीका करा असे म्हटले आहे. तसेच तुमची तेवढी पात्रता नाही असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
COMMENTS