संभाजीनगर। नगर सह्याद्री - छत्रपती संभाजीनगर येथे एक संतापजनक गोष्ट घडली आहे. एका तरुणीचे ज्या मुलाशी लग्न ठरले होते त्यालाच तीचा अश्लिल व्...
संभाजीनगर। नगर सह्याद्री -
छत्रपती संभाजीनगर येथे एक संतापजनक गोष्ट घडली आहे. एका तरुणीचे ज्या मुलाशी लग्न ठरले होते त्यालाच तीचा अश्लिल व्हिडीओ पाठवण्यात आला आहे. तरुणीच्या आधीच्या प्रियकराने हे किळसवाणे कृत्य केले आहे. या खळबळजनक घटनेमुळे पीडित तरुणी पुरती भयभीत झाली आहे. तसेच आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
वर्षभरापासून प्रेमात असलेली तरुणी दुसऱ्या मुलासोबत लग्न करणार असल्याचे कळताच त्या तरुणाने तिच्यासोबत एकांतात मोबाइलवर बनवलेला व्हिडिओ आणि काही छायाचित्रे इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. एवढेच नव्हे तर तरुणीच्या आत्याच्या मुलाला फोन करुन त्याने शिवीगाळ देखील केली आहे. हा सर्व प्रकार 1 ते 24 मार्चदरम्यान घडला आहे.
पीडितेने या बाबत माहिती मिळताच कुटुंबीयांसह एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अरबाज खान असे आरोपीचे नाव आहे.
तरुणीच्या घरी लग्न ठरल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र तो भूतकाळ अशा पद्धतीने संकट होऊन उभा राहील याची तरुणीला काहीच कल्पना नव्हाती.
COMMENTS