निघोज | नगर सह्याद्री आजच्या युगात जीवनाच्या रंगमंचावर दिवसाला भूमिका बदलणार्यांनी समाजाला तत्त्वज्ञान शिकवावे, हे दुर्दैवी आहे, असे प्रतिप...
आजच्या युगात जीवनाच्या रंगमंचावर दिवसाला भूमिका बदलणार्यांनी समाजाला तत्त्वज्ञान शिकवावे, हे दुर्दैवी आहे, असे प्रतिपादन शिवव्याख्यात्या हभप गौरीताई महाराज यांनी केले.
कन्हैय्या उद्योग समुहाच्या किर्तन सोहळ्यात त्या म्हणाल्या, जीवनात जगावे कसे व मरावे कसे हे शिकायाचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास वाचावा. आजकाल पैसा हाच सर्वश्रेष्ठ मानला जातो. पैसा आपल्याला विविध मार्गाने अधोगतीकडे नेतो. हे अनेकदा सिध्द झाले आहे. आपला उद्देश सरळ असेल तर जीवनात येणार्या वादळांना घाबरु नका. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर जय भवानी जय शिवाजी म्हणा. तुमच्या अंगात नवऊर्जा तयार होईल. हीच ऊर्जा घेत येणार्या प्रत्येक संकटाशी लढा.व्यवसायात प्रगती साधायाची असेल एकनिष्ठ शब्दाची व्याख्या समजवून घेतली पाहिजे. आपल्या व्यवसायाशी एकनिष्ठ राहिल्यानेच लंके परिवाराने कन्हैय्या उद्योग समुहाचा विस्तार केला. कन्हैय्या समुहाचे सीईओ मच्छिंद्र लंके यांचा अभ्यासू, शांत स्वभाव या प्रगतीस कारणीभूत ठरला.
यावेळी देविभोयरेचे माजी सरपंच विकास सावंत, शाहीरमामा गायकवाड, सेवा सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब लामखडे, युवा उद्योजक अभय औटी, काळभैरवनाथ डेअरीचे चेअरमन दत्तात्रय पठारे, किशन कन्हैय्याचे चेअरमन शिवाजीराव लंके, पारनेर तालुका दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लंके, साई दूध उद्योग समूहाचे अध्यक्ष मंगेश लंके, बालाजी दूध उद्योग समूहाचे अध्यक्ष अरुणशेठ लंके, विठ्ठल शेटे, भाऊ बेलोटे, दूूध उद्योग समूहातील नवउद्योजक संकेत लाळगे, दिलीप उनवणे, पत्रकार भास्कर कवाद, पारनेर तालुका प्रेस फोटोग्राफर संघटनेचे पदाधिकारी जयसिंग हरेल, सेवानिवृत्त प्राचार्य रामचंद्र महाराज सुपेकर, सोमनाथ महाराज वरखडे आदी उपस्थित होते. भाविकांचे स्वागत कन्हैय्या समुहाचे सीईओ मच्छिंद्रशेठ लंके, संस्थापक शांताराम लंके व बबनशेठ लंके यांनी केले. सुत्रसंचालन सोमनाथ वरखडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समुहाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.
COMMENTS