अहमदनगर | नगर सह्याद्री कोयत्याने एकास जिवे मारण्याचा प्रयत्न करुन फरार झालेला आरोपी संग्राम रमेश गीते याला कोतवाली पोलीसांनी अटक केली आहे. ...
कोयत्याने एकास जिवे मारण्याचा प्रयत्न करुन फरार झालेला आरोपी संग्राम रमेश गीते याला कोतवाली पोलीसांनी अटक केली आहे.
या संदर्भात विशाल मच्छिद्र शिरवाळे (रा. काटवन खंडोबा अहमदनगर) यांनी फिर्याद दिली होती. शिरवाळे त्यांच्या मोपेडवरुन केडगांव येथे मित्राकडे जात असतांना अयोध्यानगर मराठी शाळेच्याजवळ रस्त्यावर गीते (रा. रमाजीनगर, केडगांव, अहमदनगर) याने अडविले. तू सातपुतेच्या पोरांमध्ये का राहतो? म्हणून कोयत्याने जीवे ठार मारण्याच्या उददेशाने जखमी केले. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी संग्राम रमेश गीते फरार होता. तो घरी येणार असल्याचे पोलीसांना समजले. सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतले. त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. पुढील तपास सपोनि रविद्र पिंगळे करीत आहेत. आरोपी गीतेवर आणखी गुन्हे दाखल आहेत.ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सपोनि रविद्र पिंगळे, पोहेकॉ सतिष भांड, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, अब्दुल कादर इनामदार, योगेश खामकर, संदिप थोरात, अमोल गाडे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ यांच्या पथकाने केली आहे.
COMMENTS