अहमदनगर | नगर सह्याद्री वैद्यकीय क्षेत्रामध्ये चांगल्या रुग्णसेवेचे मोठे महत्व असून आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये अत्यल्प दरात अत्याधुनिक मशिनरीद्...
वैद्यकीय क्षेत्रामध्ये चांगल्या रुग्णसेवेचे मोठे महत्व असून आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये अत्यल्प दरात अत्याधुनिक मशिनरीद्वारे चांगली रुग्णसेवा मिळते, याचा अनुभव आम्ही घेतला असून, आपणही समाजाचे काही देणे लागतो, अशा उदात्त हेतूने या हॉस्पिटलमध्ये सुरु असलेले रुग्णसेवेचे कार्य हे निश्चितच अनुकरणीय व कौतुकास्पद असल्याचे गौरोद्गार नगरमधील व्हीआरडीई या आस्थापनाचे संचालक जी.आर.एम.राव यांनी काढले.
आचार्यसम्राट श्री आनंदऋषीजी म.सा. यांच्या ३१ व्या पुण्यस्मृतीदिनानिमित्त आयोजित ११ व्या मुत्रपिंड विकारावरील मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे उद्घाटन राव यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाले. याप्रसंगी ते बोलत होते. या शिबीरासाठी सरसबाई कचरदासजी सुराणा (सुराणा कॉर्नर) व परिवाराचे योगदान लाभले. याप्रसंगी कचरदास सुराणा, सरसबाई सुराणा, महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेचे रिजनल मॅनेजर डॉ. वासिम शेख, डिस्ट्रीट हेड ऑफिसर डॉ.निलेश भुसारे, जिल्हा समन्वयक डॉ.मयुर मुथा, व्हीआरडीईचे डॉ.आसित , युरोसर्जन डॉ.संकेत काळपांडे, संजय, संदिप, अनिकेत व आदित्य सुराणा, विमल सुराणा, सुनिता सुराणा , चंदा सुराणा, रिया सुराणा, प्रशासकीय अधिकारी डॉ.आशिष भंडारी, संतोष बोथरा आदी मान्यवर उपस्थित होते.
संतोष बोथरा यांनी स्वागत केले व हॉस्पिटलच्या रुग्णसेवेची माहिती दिली. ते म्हणाले, आचार्यश्री आनंदऋषीजी यांचे एक स्वप्न होते ते म्हणजे रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’. या तत्वावर या हॉस्पिटलचे रुग्णसेवेचे कार्य सुरु असून, प्रबुद्ध विचारक आदर्शऋषीजी यांच्या मार्गदर्शनाखाली हे हॉस्पिटलचे कार्य बहरत आहे. या मोफत शिबीराच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे सहा हजार रुग्ण लाभ घेतात. हे हॉस्पिटल कायम नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत असते. राव पुढे बोलतांना म्हणाले की, या हॉस्पिटलच्या चांगल्या रुग्णसेवा कार्याची प्रचिती सर्वदूर पोहचलेली असून, मागील दोन वर्षांमध्ये कोविडच्या प्रादुर्भावाच्या काळातही जीवाची पर्वा न करता या हॉस्पिटलच्या डॉटर्स व स्टाफने संपूर्ण जिल्हाभर दिलेली चांगली रुग्ण सेवा वाखणण्याजोगी आहे. आज वैद्यकीय सेवा धंदेवाईक होत असताना या हॉस्पिटलने अत्यल्प दरात चांगली आरोग्य सेवा देऊन रुग्ण सेवाभाव जपला आहे. यासाठी जैन सोशल फेडरेशनचे मी विशेष अभिनंदन करतो. विमल सुराणा म्हणाल्या, आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या या गरजूंसाठीच्या मोफत शिबीरासाठी सुराणा परिवाराला आपण प्रायोजकत्व देऊन या पुण्यकार्यात सहभागी करुन घेतले. यापुढेही अशा शिबीरांसाठी सुराणा परिवारातर्फे सर्व सहकार्य राहील.या शिबीरातील तज्ञ डॉटर व मुत्रविकार शल्यचिकित्सक डॉ.संकेत काळपांडे यांनी मुत्रपिंड, मुत्रमार्ग, मुत्राशय तसेच स्टोन शस्त्रक्रिया या संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले व रुग्णांची तपासणी केली. या शिबीराचा ९७ रुग्णांनी लाभ घेतला. शिबीराचे आयोजन सरसबाई कचरदासजी सुराणा व परिवाराचा सत्कार व्हीआरडीईचे संचालक राव यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन करण्यात आला.
COMMENTS