निघोज | नगर सह्याद्री निघोज परिसरातील पुष्पावती नदीत मासांहारी पदार्थांचा कचरा टाकला जातो त्याचे निर्मुलन करण्याची व त्या ठिकाणी हा मासांहा...
निघोज | नगर सह्याद्री
निघोज परिसरातील पुष्पावती नदीत मासांहारी पदार्थांचा कचरा टाकला जातो त्याचे निर्मुलन करण्याची व त्या ठिकाणी हा मासांहारी पदार्थांचा कचरा न टाकण्यासाठी ग्रामपंचायतीने उपाययोजना करण्याची गरज असल्याची मागणी युवा नेते रुपेश ढवण यांनी केली आहे.
नुकत्याच झालेल्या एका दशक्रिया विधी कार्यक्रमात काकस्पर्श होण्यास बराच विलंब झाला. त्यावेळी ढवण यांनी उपस्थित लोकांना हे आवाहन करुण ग्रामपंचायतने यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. यावेळी बराच विलंब झाल्यानंतर ढवण यांनी आपली भुमिका विषद करताना सांगितले की या पुष्पावती नदीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कचरा आणि मासांहारी पदार्थांचा कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जातो.यामध्ये कोंबड्यांचे पिसे तसेच मच्छीचा वाया गेलेला भाग मोठ्या प्रमाणात टाकला जातो. याची दुर्गंधी तर या ठिकाणी सातत्याने येतच असते. शिवाय कोंबडीचे पिसे वार्यामुळे स्मशानभूमीत सातत्याने येत असतात. दशक्रिया विधी व अंत्यविधी साठी येणार्या लोकांना तसेच वडनेर, शिरापूर तसेच वाडीवस्तीवर जाणार्या व येणार्या हजारो लोकांना या दुर्गंधीचा त्रास सातत्याने होत असतो. याठिकाणी जो मासांहारी पदार्थांचा कचरा टाकला जातो त्यावर परिसरातील कावळे मोठ्या प्रमाणात ताव मारतात. जेणेकरून दशक्रिया विधी दिवशी हे कावळे मांसाहारी पदार्थ कचरा सातत्याने खात असल्याने काक स्पर्श करण्यासाठी येत नाहीत पर्यायाने काक स्पर्श होण्यास विलंब होतो.कुटुंबाला भविष्यात अडचण निर्माण होऊ नये यासाठी नाशिकला जाउन विधी करणे भाग पडते हा विधी सर्वसामान्य जनतेला आर्थिक दृष्ट्या परवडत नाही. यासाठी एकच उपाय आहे.तो म्हणजे या पुष्पावती नदीमध्ये कोनत्याही प्रकारचा कचरा टाकू देण्यास तातडीने बंदी करावी यासाठी निघोज ग्रामपंचायतीने पुढाकार घेण्याची गरज असल्याची मागणी ढवण यांनी केली आहे.
ढवण यांनी दशक्रिया विधी मध्ये ही मागणी करताच उपस्थितांनी ढवण यांच्या मागणीचे समर्थन केले. हा दुर्गंधीयुक्त कचरा पुष्पावती नदीमध्ये टाकला जाउ नये यासाठी अनेक सामाजिक संघटनांनी पाठींबा दिला आहे.मात्र मासांहारी पदार्थांची विक्री करणार्या दुकानदारांची संख्या जास्त आहे. त्यामध्ये सर्वधर्मीय लोक आहेत. हा कचरा नदीत टाकल्याने दुर्गंधी सुटते. त्याचा त्रास सर्वांनाच होतो असे असूनही त्यावर उपाययोजना होत नाही. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून ते काम सध्या बंद आहे. यावर ग्रामसेवक दत्तात्रय वाळके यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित ठेकेदाराने या प्रकल्पाच्या कामाचा आराखडा सादर न केल्याने हे काम बंद असल्याचे सांगितले आहे. हे काम पुर्ण होत नाही तोपर्यंत तरी हा कचरा या ठिकाणी टाकला जाउ नये अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मटन मच्छी व्यवसायीकांनी गावाबाहेर एकाच ठिकाणी ही दुकाने सुरू करण्याची गरज आहे. निघोज व परिसरात यात्रा जत्रा उत्सव मोठ्या प्रमाणात होत असतात. शिवाय गाव व परिसरातील वाड्या वस्त्यावर अखंड हरिनाम सप्ताह साठी लाखों रुपये खर्च करुन नामवंत किर्तनकारांचे किर्तने होत असतात मात्र मटन विक्री मात्र मारुती मंदिरासमोर केली जाते. हा प्रकार तातडीने बंद न झाल्यास याचा वाईट परिणाम होऊ शकतो हा इशारा धार्मिक संघटनेने दिला आहे.
COMMENTS