अहमदनगर| नगर सह्याद्री आज देशभरातील श्रीराम भक्त सामुहिक हनुमान चालिसा पाठ करत असून या पाठाचे लाभ अनुभवत आहेत. सामुहिक हनुमान चालिसा पाठ करण...
आज देशभरातील श्रीराम भक्त सामुहिक हनुमान चालिसा पाठ करत असून या पाठाचे लाभ अनुभवत आहेत. सामुहिक हनुमान चालिसा पाठ करण्याचा शुमारंभ २४ वर्षांपूर्वी नगरमधील लक्ष्मीनारायण सत्संग मंडळाने केला होता, असा गौरवपूर्ण उल्लेख अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष पू.स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केला.
अयोध्येच्या श्रीराममंदिरात मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त संपूर्ण जगामध्ये श्रीरामभक्तिच्या चेतनेचा संचार करण्याच्या उद्देशाने शतकोटी श्रीहनुमान चालिसा पाठ अभियानाचा शुभारंभ दिल्लीमधील अक्षरधाम मंदिराच्या प्रांगणात करताना ते बोलत होते.
व्यासपीठावर स्वामी अवधेशानंद गिरीजी महाराज, स्वामी पुण्यानंद गिरीजी महाराज, स्वामी परमात्मानंद सरस्वतीजी महाराज, स्वामी ज्ञानानंदजी महाराज, स्वामी बालकानंद गिरीजी महाराज, स्वामी प्रणवानंद सरस्वतीजी महाराज, स्वामी विश्वेश्वरानंद गिरीजी महाराज, पू.स्वामी गोपालशरणदेवाचार्यजी महाराज, जैन आचार्य लोकेशमुनीजी महाराज, अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमीचे चंपतरायजी व नृपेंद्रमिश्राजी, विश्व हिंदू परिषदेचे अलोककुमारजी, बीएपीएस शोध संस्थान अक्षरधामचे स्वामी भद्रेशदास, पतंजली योगपीठचे स्वामी रामदेव आदी देशभरातील मान्यवर संत-महंत उपस्थित होते.
पू.स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज पुढे म्हणाले, महाराष्ट्रामधील नगर शहरातील लक्ष्मीनारायण सत्संग मंडळातील युवकांना २४ वर्षांपूर्वी एकत्र करून होळी पौर्णिमेपासून हनुमान जयंतीपर्यंत दररोज नियमितपणे सामुदायिक हनुमान चालिसा पाठ करण्यास सांगितले होते. तेव्हा उपस्थित युवकांनी सामुदायिक हनुमान चालिसा पाठ केल्याने काय होईल? असा प्रश्न केला होता. अवघ्या देशाचे वातावरण बदलेल. देशात पुरूषार्थ जागेल. देशाचे भविष्य उज्वल, उज्वल अधिक उज्वल होत जाईल. ते ऐकून सामुदायिक हनुमान चालिसा पाठ घरा-घरांमधून करण्यास सुरूवात झाली होती. त्या घटनेस या हनुमान जयंतीला २४ वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या काही वर्षांपासून हे पाठ करण्यास मंदिरांचे प्रांगणही कमी पडू लागले इतका प्रतिसाद मिळतो आहे. आज अनेक स्थानी हे पाठ होवू लागले मात्र या पाठाचा शुभारंभ नगरच्या लक्ष्मीनारायण सत्संग मंडळाने केला, हे मंडळाचे योगदान विसरता येणार नाही, या सोहळ्याचे निवेदक संजय मालपाणी होते. नगर शहरातील गंजबाजारातील सारडा गल्लीत असलेल्या श्रीलक्ष्मीनारायण मंदिरामधील लक्ष्मीनारायण सत्संग मंडळाचा थेट दिल्लीमधील अक्षरधाम मंदिरात देशभरातील संतांच्या उपस्थितीत स्वामी गोविंददेव गिरीजी महाराजांनी केलेला उल्लेख ऐकताना मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला कृतकृत्य झाल्याचे समाधान मिळाले. सलग २४ वर्षांपासून सुरू असलेल्या सामुहिक हनुमान चालीसा पाठाच्या उपासनेची व्दितपपूर्ती साजरी करताना सर्वांचा उत्साह दुणावला आहे.अयोध्येत श्रीराम मंदिरात भगवान श्रीरामांच्या प्रतिष्ठापनेचा महोत्सव १५ जानेवारी २०२४ च्या सुमारास करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्याकरिता २१ मार्च २०२३ पासून १५ जानेवारी २०२४ पर्यंत सलग ३०० दिवस संपूर्ण भारत देशात सांस्कृतिक ऊर्जेचा संचार व्हावा म्हणून शतकोटी श्रीहनुमान चालिसा पठणाचा संकल्प करण्यात आला आहे.
COMMENTS