अहमदनगर | नगर सह्याद्री नगर शहर व उपनगरात आज सर्वत्र श्रीराम नवमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला आहे. प्रभू श्री रामचंद्र जन्मोत्सव समि...
अहमदनगर | नगर सह्याद्री
नगर शहर व उपनगरात आज सर्वत्र श्रीराम नवमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला आहे. प्रभू श्री रामचंद्र जन्मोत्सव समिती, नगर शहर यांच्यावतीने शहरातून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. पारंपारिक वाद्यांसह काढण्यात आलेल्या या शोभायात्रेने नगरकरांचे लक्ष वेधून घेतले होते.
दुपारी ३ वाजता मंगलगेट येथील सरदार वल्लभभाई पटेल चौक येथून शोभा यात्रेस प्रारंभ झाला. प्रभू श्रीरामांची १५ फूट उंचीची भव्य अशी मुर्ती तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि गोमातेची मुर्ती यांचा शोभा यात्रेत सहभाग होता. नगर शहरात पहिल्यांदाच अशा प्रकारची शोभा यात्रा काढण्यात आली आहे. शोभा यात्रेत वारकरी सांप्रदाय, घोडे, बॅण्ड पथक तसेच शिरूर येथील ढोलताशा पथक सहभागी झाले होते. नियोजीत मिरवणूक मार्गावरून ही शोभा यात्रा काढण्यात येऊन दिल्लीगेट येथे समारोप झाला. ठिकठिकाणी नगरकरांच्यावतीने शोभा यात्रेचे स्वागत करण्यात आले.
COMMENTS