अहमदनगर | नगर सह्याद्री आपल्या प्रत्येकावर समाजाचे ऋण असते. समाजऋणातुन उतराई होण्यासाठी गरजूंना मदत करण्याची तयारी असली पाहिजे. आपण दिलेला ...
आपल्या प्रत्येकावर समाजाचे ऋण असते. समाजऋणातुन उतराई होण्यासाठी गरजूंना मदत करण्याची तयारी असली पाहिजे. आपण दिलेला आधार त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. यातून लाखमोलाचे आशीर्वाद मिळतात. जैन वात्सल्य संस्था अनेक वर्षांपासून नगरमध्ये सामाजिक कार्य करीत आहे. अखंडपणे सुरु असलेल्या या मदतीच्या उपक्रमात सहभागी होताना आनंद मिळतो, असे प्रतिपादन गांधी केमिकल्सचे सुशिल हस्तीमल गांधी यांनी केले.
जैन ओसवाल वात्सल्य संस्थेच्या वतीने दर महिन्याप्रमाणे याही महिन्यात गरजू कुटुंबांना महिनाभराचा किराणा व अन्नधान्य देण्यात आले. सुशील गांधी व सचिन अशोक कोठारी यांच्या हस्ते ही मदत वितरित करण्यात आली. अशोक कोठारी यांच्या संकेश्वर निवासस्थानी हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अजित बोरा, सेक्रेटरी विजय गुगळे, आनंद गांधी, आनंद चंगेडिया, अर्बन बँकेचे संचालक ईश्वर बोरा, मॉर्निंग ग्रुपचे नंदलाल कोठारी, मनोज मुथा आदी उपस्थित होते.
या उपक्रमासाठी सौरभ व प्रमिलाबाई बोरा, सविता रमेश फिरोदिया, रमेश फिरोदिया, चंपालाल विजयजी मुथा,अशोक बोरा, संतोष पनालाल बोगावत, अनिल हिरालाल पोखरणा , अजय अतुल बोरा, विकी मुथा, सतिष मुथा , कुणाल विजय गुगळे , किशोर श्रेयस पितळे, रितेश नंदलाल कोठारी, साहिल सचिन मुथा यांचे सहकार्य लाभले.सचिन कोठारी म्हणाले की, कोणताही उपक्रम सुरू करणे सोपे असले तरी त्यात सातत्य राखणे महत्त्वाचे असते. जैन ओसवाल वात्सल्य संस्था अनेक वर्षांपासून गरजूंना मदतीचा हात देत आहे. या कार्यात योगदान देताना मदत सार्थकी लागल्याचा आनंद नक्कीच मिळतो. प्रास्ताविकात अजित बोरा म्हणाले की, समाजातील गरजूंना मदत करण्याचा हा उपक्रम संस्था १९७७ पासून अविरतपणे राबवित आहे. या कामी समाजातील अनेक दानशूरांचे मोलाचे सहकार्य लाभते. सामूहिक प्रयत्नांतूनच आपण समाजातील वंचितांना आधार देवू शकतो. शेवटी सेक्रेटरी विजय गुगळे यांनी आभार मानले.
COMMENTS