अहमदनगर | नगर सह्याद्री देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रीय सहभाग घेऊन हौतात्म्य पत्करलेले देशाचे सुपुत्र व सिंधी समाजाचे युवक शहीद हेमू काल...
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रीय सहभाग घेऊन हौतात्म्य पत्करलेले देशाचे सुपुत्र व सिंधी समाजाचे युवक शहीद हेमू कालानी यांची जन्मशताब्दी भारतीय सिंधू सभेच्या वतीने देशभर साजरी करण्यात आली. या जन्मशताब्दी सोहळ्याचा समारोप भोपाळ येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर संघचालक हेमंत भागवत यांच्या उपस्थितीत होणार्या एका विशेष कार्यक्रमाने होणार आहे.
यावेळी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चव्हाण, इंदोरचे खासदार शंकर लालवाणी यांच्यासह देशातील सिंधी समाजाचे लोकप्रतिनिधी, समाजाचे साधुसंत व भारतीय सिंधू सभेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी भारतीय सिंधू सभेचे नगर जिल्हाध्यक्ष दामोदर बठेजा यांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्ह्यातून शेकडो सिंधी बांधव गुरवारी रात्री झेलम एसप्रेस रेल्वेने भोपाळला रवाना झाले. त्यांना रेल्वे स्टेशनवर शुभेच्छा देण्यासाठी रा.स्व.संघाचे पदाधिकारी, भारत भारती व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भारतमाता की जय, जय श्रीराम, जय झुलेलाल, शहीद हेमू कालानी अमर रहे, चलो भोपाळ... अशा घोषणा देण्यात आल्या.
हेमू कालानी यांनी केवळ ८ व्या वर्षी इंग्रजांविरोधात आंदोलन सुरु केले. यांना वयाच्या १९ व्या वर्षी फाशीची शिक्षा झाली होती. मात्र त्यांचे कार्य व देशसेवेसाठी दिलेले योगदान विस्मरणात गेले होते. भारतीय सिंधू सभेने पूर्ण देशात विविध कायर्क्रम व उपक्रमांचे आयोजन करून शहीद हेमू कालानी यांचे कार्य देशापुढे आणले. अशा महान देशभक्ताची जन्मशताब्दी मोठ्या उत्सहात नगर जिल्ह्यासह पूर्ण देशात साजरी झाली. भोपाळ येथे होणार्या जन्मशताब्दी समारोप सोहळ्यासाठी देशातून लाखो सिंधी बंधू भगिनी येणार आहेत. नगर मधूनही मोठ्या संख्यने सिधी नागरिक जात आहेत, अशी माहिती यावेळी भारतीय सिंधू सभेचे नगर जिल्हाध्यक्ष दामोदर बठेजा यांनी दिली.
रेल्वे स्टेशनवर शुभेच्छा देण्यासाठी रा.स्व.संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, जेष्ठ पदाधिकारी रवींद्र मुळे, जिल्हा कार्यवाह वाल्मिक कुलकर्णी, शहर भाजपाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, दीनदयाळ परिवाराचे संस्थापक वसंत लोढा, भारत भारतीचे अध्यक्ष चेतन जग्गी, उपाध्यक्ष दिनेश छाबरिया, सचिव समीर बोरा, हरजीतसिंग वधवा, माजी महापौर बाबासाहेब वाकळे आदींसह विविध क्षेत्रतील नागरिक उपस्थित होते. यावेळी भारतीय सिंधू सभेचे शहर अध्यक्ष रमेश कुकरेजा, उपाध्यक्ष अशोक अहुजा, गोपाल भागवनी, सचिव जितेश सचदेव आदींसह महिला व नागरिक उपस्थित होते.
COMMENTS