विकास पॅनलकडून सहकार पॅनलचा धुव्वा अहमदनगर | नगर सह्याद्री पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचार्यांच्या सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत...
विकास पॅनलकडून सहकार पॅनलचा धुव्वा
अहमदनगर | नगर सह्याद्रीपाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचार्यांच्या सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत विकास पॅनलचे २१ पैकी १९ उमेदवार विजयी झाल्याने पॅनलने संस्थेवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणूकीत सहकार पॅनलला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले.
पतसंस्थेच्या निवडणूकीसाठी शनिवारी मतदान पार पाडले यावेळी १ हजार ४३० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. १९ मार्चला औरंगाबाद रस्त्यावरील इंदायणी लॉन्स येथे मतमोजणी पार पाडली. पॅनलप्रमुख किशोर गांगर्डे यांच्या नेतृत्वाखाली विकास पॅनलने तब्बल ७ वर्षांनी पतसंस्थेमध्ये सत्तांतर घडवून आणले. यावेळी पॅनलचे माजी अध्यक्ष, चेअरमन व जेष्ठांचे मार्गदर्शन विकास पॅनलला लाभले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए. ए. शेख यांनी काम पाहिले. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार व समर्थकांनी मोठा जल्लोष केला.यावेळी बोलताना विकास पॅनलचे अध्यक्ष किशोर भाऊसाहेब गांगर्डे यांनी ज्यांनी निवडणूकीमध्ये प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहकार्य केले त्या सभासदांचे जाहीर आभार मानले व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. निवडणूक प्रचार शुभारंभ प्रंसगी जो वचननामा जाहिर केलेला आहे. त्याची वचनपूर्ती करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते : दत्तात्रय आवारी (७२७), गणेश कवडे पाटील (७४६), संदिप पवार (७३९), अमृता पोळ (७३७), अर्चना गायकवाड(६९२), सुरेश ढोमसे (६६५),रविंद्र यादव(७२५), जगदिश वाघ(७१६),संभाजी निमसे(७४८), महेश भावसार(७४६),अशोक राशीनकर (७६२) संदिप शेरकर (७१८) किशोर गांगर्डे ( ७२१) दिपक वाघ (७६०) किशोर सांगळे (७५१)देविदास शेटे (७६६),संतोष जायभाय (७२५)अरविंद वाव्हळ (७४४) विशाल सरोदे (६९९)
COMMENTS