जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी उदासीन पारनेर | नगर सह्याद्री जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे परिवर्तनच्या पाठपुराव्या नंतर मुलींच्या स्व...
जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी उदासीन
पारनेर | नगर सह्याद्री
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे परिवर्तनच्या पाठपुराव्या नंतर मुलींच्या स्वच्छतागृह स्वच्छतागृहा बाबत शिक्षण विभागाने फक्त फार्स केला असून परिवर्तन या सामाजिक संस्थेने महिला स्वच्छतागृह दुरावस्थेबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई चाकणकर यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.त्यामुळे महिला आयोगाने तातडीने भरारी पथक नेमण्याचे आदेश महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी दिले आहेत.
मुलींच्या स्वच्छतागृहांची स्वच्छता न झाल्याने आणि शिक्षणाधिकारी हे फक्त पत्रव्यवहाराचा फार्स करत असल्याचे दिसून आल्याने हा विषय परिवर्तनने थेट महिला आयोगाकडे नेला आहे.
जिल्हा परिषदेच्यावतीने निवेदन स्वीकारतानाच नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरकर यांना तातडीने याबाबत पावले उचलून ८ दिवसात हा विषयमार्गी लावा,असे आदेश चाकणकर यांनी प्रशासनाला दिले आहेत. शिक्षणअधिकारी हे मुलींच्या आरोग्याबाबत उदासीन असून त्यांना या बाबत काहीही देणे घेणे नाही आणि त्यांची महिला द्वेषाची भूमिका यातून दिसून येते याबाबत शिक्षणाधिकारी (माध्यमिक )यांची स्वतंत्र तक्रार महिला अयोग आणि शिक्षण विभागाकडे केली जाईल असे परिवर्तन अध्यक्ष सचिन भालेकर यांनी सांगितले. महिलांच्या आणि मुलींच्या आरोग्याबाबत शाळांनी काळजी घेणे गरजेचे आहे. स्वच्छतागृह अद्ययावत असावेत ही संस्था चालक म्हणून आमची जबाबदारी आहे ,जिल्हाशिक्षण अधिकारी हे कोणत्याच प्रकरणात गंभीर नसतात आणि त्यांना कोणत्याही पत्राला उत्तर देण्याची गरज भासत नाही का? असा सवाल कृषिजन्य विकास संस्थेचे कार्याध्यक्ष सुहास सदाशिव शेळके यांनी केला आहे.दोन महिने पाठपुरावा करूनही जर प्रश सुटत नसेल तर अश्या शिक्षणाधिकार्यांना खरे तर निलंबित केले जावे, अशी परिवर्तनची मागणी आहे.१४ दिवसात जर या प्रश्नी लक्ष न दिल्यास हे आंदोलन थांबणार नाही व कायदेशीर मार्गाने कोर्टात दाद मागितली जाईल, असे परिवर्तनने सांगितले.
COMMENTS