अहमदनगर | नगर सह्याद्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे भक्त डॉ.सी.बी.कुलकर्णी यांचा विश्व हिंदू परीषदेकडून सत्कार करण्यात आला. डॉ.क...
अहमदनगर | नगर सह्याद्री
ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे भक्त डॉ.सी.बी.कुलकर्णी यांचा विश्व हिंदू परीषदेकडून सत्कार करण्यात आला.
डॉ.कुलकर्णी यांनी संकल्प करून थोरले श्रीरामाचे मंदिर नेप्ती आश्रम येथे उभारले आहे. येथे श्रीराम नवमी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज यांचे उपासक व रामभक्त डॉ.सी.बी. कुलकर्णी यांचे धार्मिक कार्यात मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र धर्म प्रसार सहप्रमुख मिलिंद मोभारकर यांनी केले आहे. याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे, जिल्हा सहमंत्री मुकुल गंधे, पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रिंट मीडिया प्रमुख अमोल भांबरकर, शहर मंत्री श्रीकांत नांदापूरकर,सहमंत्री संजय बंडी,मठमंदीर समितीचे जिल्हाप्रमुख हरिभाऊ डोळसे,शहर प्रमुख मनोहर भाकरे, राजेंद्र चुंबळकर, दिग्विजय बसापुरे, आदिंसह विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS