अहमदनगर | नगर सह्याद्री सावेडी उपनगरात पाईपलाईन रोडवरील श्रीराम चौकात मित्र मंडळाच्यावतीने रामनवमी साजरी करण्यात आली. २१ वर्षांपुर्वी श्रीरा...
अहमदनगर | नगर सह्याद्री
सावेडी उपनगरात पाईपलाईन रोडवरील श्रीराम चौकात मित्र मंडळाच्यावतीने रामनवमी साजरी करण्यात आली. २१ वर्षांपुर्वी श्रीराम चौक फलकाचे अनावरण करण्यात आले होते. रामनवमीला हा फलक लावण्यात आला होता. दरवर्षी रामनवमीला या फलकावर असलेल्या श्रीरामांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन प्रसादाचे वाटप करण्यात येते.
यंदा २२ व्या वर्षी हा फलक रंग-रंगोटी करुन बसविण्यात आला. श्रीराम चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष विशाल नाकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली रामनवमीला येथील रिक्षा स्टाफ परिसरातील व्यावसायिकांनी फलकास पुष्पहार अर्पण करुन, टरबूज व शिर्याचा प्रसाद वाटप करुन उत्सव साजरा केला. यावेळी परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करुन प्रसादाचा लाभ घेतला. यावेळी विश्व हिंदु परिषदेचे मुकुल गंधे यांनी चौकातून रॅलीस प्रारंभ केला. यावेळी दिनेश कुलकर्णी, प्रविण घुंगार्डे, संजय कर्डिले, दत्तु सुपेकर, संदीप रासकर, कृष्णनाथ आंधळे, रमेश संत, दिपक खुडे, अनिल ढवण, आण्णा चांदकोटी, विजू पानमळकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
COMMENTS