नाशिक /नगर सह्याद्री - मुस्लिम मुलींनी हिंदू मुलांशी लग्न केल्यास दहा फायदे होतील असे सुदर्शन राष्ट्रनिर्माण ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश चव्हाणके...
नाशिक /नगर सह्याद्री -
मुस्लिम मुलींनी हिंदू मुलांशी लग्न केल्यास दहा फायदे होतील असे सुदर्शन राष्ट्रनिर्माण ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश चव्हाणके यांनी सांगून खळबळ उडवून दिली आहे. सकल हिंदू समाजातर्फे नाशिकला आयोजित सभेत चव्हाणके बोलत होते.
हिंदू मुळाशी लग्न केल्यास मुलीला सवती ठेवण्याची गरज नाही. वाढलेल्या तापमानात बुरखा घालण्यापासून सुटका होईल, संपत्तीत अर्धा वाटा मिळेल. तीन वेळा तलाक म्हणून कुणीही फारकत देणार नाही. पुनर्जन्माची हमी मिळेल. सात जन्मापर्यंत साथ मिळेल, असे ते म्हणाले. नाशिकमध्ये पाचशेपेक्षा जास्त मुली लव्ह जिहादच्या बळी ठरल्या असून आमच्या बहिणीकडे वाईट नजरेने कोणी पाहणार असेल तर शांत बसणार काय, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. जिल्ह्यात बांगलादेशी हटाव मोहीम हाती घेतली जाईल. नरेंद्र मोदी पंतप्रधान असतानाही आजही काश्मीरमध्ये नऊ वर्षात नऊ हिंदू देखील जाऊन राहू शकले नाहीत. जिल्ह्यातील पेठ, हरसूल, त्र्यंबक या भागात मोठ्या प्रमाणात धर्मांतर होत आहे. राज्यात लव्ह जिहाद विरोधी कायदा झाला पाहिजे, कठोर धर्मांतर बंदी कायदा केला पाहिजे, मोदी यांनी अल्पसंख्यांक मंत्रालय बंद करावे, देशाला हिंदू राष्ट्र घोषित करावे आदी मागण्या चव्हाणके यांनी केल्या.
COMMENTS