नवी दिल्ली वृतसंस्था- कानपूरच्या देहातमध्ये असलेल्या एका झोपडीला आग लागल्याने या आगीत पती-पत्नी आणि त्यांची तीन मुले जिवंत जळाल्याची धक्कादा...
नवी दिल्ली वृतसंस्था-
कानपूरच्या देहातमध्ये असलेल्या एका झोपडीला आग लागल्याने या आगीत पती-पत्नी आणि त्यांची तीन मुले जिवंत जळाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्यरात्री झोपडीला आग लागली तेव्हा सर्वजण झोपडीत गाढ झोपलेले होते. आगीचे रौद्ररूप इतके भयंकर होते की, त्यांना बाहेर देखील पडता आले नाही. माहिती मिळताच पोहोचलेल्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत कुटुंबातील पाच सदस्य आणि संपूर्ण घर जळून खाक झाले होते.
रुरा येथील हरमौ गावात बंजारा डेरा आहे. या वस्तीत शेकडो कुटुंबे झोपड्यांमध्ये राहतात. ही घटना रुरा पोलीस ठाण्याच्या हरामौ गावातील बंजारा समाजाच्या वस्तीतील आहे. या डेऱ्यात प्रकाश हा पत्नी रेशम, मुलगा सतीश, सून काजल आणि दोन नातवंडांसह एका झोपडीत राहत असे. प्रकाश आणि सतीश हे मजूर म्हणून काम करायचे. शनिवारी रात्री ते नेहमीप्रमाणे घरी परतले. घरी पत्नी, सून आणि मुलांसोबत जेवण केले. यानंतर संपूर्ण कुटुंब झोपडीत गेले.
प्रकाश आणि त्यांची पत्नी रेशम हे झोपडीबाहेर दारातच खाट टाकून झोपले होते. रात्री उशिरा झोपडीला आग लागल्यावर सर्वप्रथम पालकांना जाग आली. आगीचे लोळ पाहून गावात एकच आरडाओरड झाली. आग विझविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत आतील पाचही जणांना आपला जीव गमावावा लागला.
मृत सतीशचे वडील प्रकाश यांनी डोळ्यातील पाणी पूसत सांगितले की, एका कोपऱ्यातून लागलेल्या आगीने एका मिनिटात संपूर्ण झोपडीला वेढले. डोळ्यसमोर मुलाचा आवाज ऐकू आला... बाबांना वाचवा. आगीमुळे मुख्य दरवाजातून आत जाता आले नाही. दुसऱ्या बाजूने कुटुंबाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण बाहेर काढता आले नाही. पाच मिनिटात माझे संपूर्ण कुटुंबाची राखरांगोळी झाली. ही आग अचानक कशी लागली काहीच कळाले नाही.झोपडीला आग लागली. या अपघातात पाच सदस्याचा होरपळून मृत्यू झाला.
COMMENTS