मुंबई /नगर सह्याद्री - झी स्टुडिओज' आणि नागराज मंजुळे यांच्या आगामी 'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटात भूमिका करत असलेली या चित्रपट...
मुंबई /नगर सह्याद्री -
झी स्टुडिओज' आणि नागराज मंजुळे यांच्या आगामी 'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटात भूमिका करत असलेली या चित्रपटाची नायिका सायली पाटील महाराष्ट्राची नवीन क्रश ठरत आहे .तिने तरुणाईला वेड लावले आहे.
या चित्रपटातल्या 'गुन गुन' या गाण्यातली आकाश ठोसर आणि सायली पाटील यांच्यातली रोमँटिक केमिस्ट्री बघून तरुणाई त्यांच्या प्रेमात पडली आहे. विशेषतः या चित्रपटातून मराठीत पदार्पण करणाऱ्या सायली पाटीलची 'गुन गुन गर्ल' अशी ओळख निर्माण झाली असून ती महाराष्ट्रातल्या तरुणाईचा नवा क्रश बनली आहे.‘सैराट’मधल्या आर्चीच्या भूमिकेसाठी नागराज मंजुळे यांनी सायलीला शॉर्टलिस्ट केलं होतं; परंतु पुढं त्या भूमिकेसाठी रिंकूची निवड झाली. सायलीची ती संधी तेव्हा हुकली असली, तरी आता 'घर बंदूक बिरयानी'मधून ती नायिकेच्या भूमिकेत झळकणार आहे. याच चित्रपटातल्या 'गुन गुन' या गाण्याला यू-ट्यूबवर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. हजारो प्रेक्षकांनी कमेंट करत गाण्याचे तर कौतुक केलेच, पण त्याबरोबरच सायली आणि आकाशची रिफ्रेशिंग जोडी आवडल्याच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
COMMENTS