शिंदे-फडणवीस सरकारची मोठी घोषणा | अर्थसंकल्प सादर मुंबई | नगर सह्याद्री- राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंड...
शिंदे-फडणवीस सरकारची मोठी घोषणा | अर्थसंकल्प सादर
मुंबई | नगर सह्याद्री-
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मोठी घोषणा केली आहे. यानुसार महाराष्ट्रातील शेतकर्यांना दरवर्षी १२ हजार रुपये मिळणार आहेत. केंद्र सरकारकडून दरवर्षी मिळणार्या ६ हजार रुपयांच्या मदतीत राज्य सरकारही ६ हजार रुपयांची भर घालून ही रक्कम देणार आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज हवामान बदल, अवकाळी पाऊस, अवर्षण अशा असंख्या समस्यांनी अन्नदाता ग्रासला आहे. शाश्वत शेतीसाठी अनेक उपाय होत असले, तरी त्याला हक्काच्या मदतीची गरज आहे. कायम शेतकर्यांच्या पाठिशी उभे राहण्याचीच आमची भूमिका आहे. यावर्षी अडचणीत असलेल्या कांदा उत्पादक शेतकर्यांना आवश्यक ती मदत केली जाईल.
अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून साकारलेला प्रधानमंत्री कृषीसन्मान निधी योजनेत राज्य सरकारच्या अनुदानाची भर घालण्यात येईल. त्यानुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ आम्ही जाहीर करत आहोत. या योजनेत केंद्र सरकारच्या प्रतिवर्ष प्रतिशेतकरी ६ हजार रुपयांमध्ये राज्य सरकार आणखी ६ हजार रुपयांची भर घालेल, अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली.
त्यामुळे राज्यातील शेतकर्यांना प्रतिवर्षी १२ हजार रुपये मिळतील. याचा लाभ १ कोटी १५ लाख शेतकरी कुटुंबांना होणार आहे. त्यासाठी २०२३-२४ साठी ६ हजार ९०० कोटी रुपये इतया निधीची तरतूद केली जाईल, असंही फडणवीसांनी नमूद केलं.
- आता शेतकर्यांवर कोणताच भार नाही. राज्य सरकार भरणार हप्ता.
- शेतकर्यांना केवळ १ रुपयांत पीकविमा.
- ३३१२ कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार.
- कोकणातील सिंचनासाठी १५ हजार कोटी रुपयांची तरतूद.
- जलयुक्त शिवार योजना - २ पुन्हा राबवण्याचा निर्धार.
- घर घर जल योजनेसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला.
- अल् निनोमुळे मान्सूनचा पाऊस कमी होण्याचा अंदाज.
- गोपीनाथ मुंडे अपघात योजना लागू करणार.
- सेंद्रीय शेतीसाठी एक लाख कोटी रुपयांची तरतूद.
- ८६ हजार पंपांना तात्काळ वीज जोडणी देण्याचा निर्धार.
- कोकणातील पाणी नदीजोड प्रकल्पातून मराठवाड्यात नेणार.
- मच्छिमारांसाठी ५ लाख रुपयांच्या विम्याची तरतूद.
- ड्रोन, सॅटीलाइटने आता नुकसानीचे पंचनामे होणार.
- गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ३०० कोटी रुपयांची केली तरतूद.
- बुलढाण्यात संत्रा प्रक्रिया प्रकल्पासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद.
- नागपूर आणि नाशिकमधल्या उद्यानासाठी २५० कोटी रुपयांची घोषणा.
- अपघात शेतकऱ्यांच्या कुटुंबाला दोन लाखापर्यंत सानुग्रह अनुदान देणार.
- धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १५ हजार रुपयांची केली घोषणा.
- मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार. मागेल त्याला फळबाग, मागेल त्याला आधुनिक पेरणीयंत्र देणार.
- शेतकऱ्यांचा पीक विमा सरकार भरणार. नमो शेतकरी योजनेची सरकारकडून घोषणा.
- शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून ६ हजार ९०० कोटी रुपयांची घोषणा.
- प्रधान मंत्री किसान सन्मान योजनेत भर. नमो शेतकरी महा सन्मान योजना. शेतकऱ्यांना सहा हजार देणार. केंद्रसह १२ हजार रुपयांचा लाभ मिळणार.
COMMENTS