मुंबई | नगर सह्याद्री- सत्तांतरानंतर आज शिंदे-फडणवीस सरकार प्रथमच आपला अर्थसंकल्प सादर करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे अ...
मुंबई | नगर सह्याद्री-
सत्तांतरानंतर आज शिंदे-फडणवीस सरकार प्रथमच आपला अर्थसंकल्प सादर करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे अर्थविभागाचा कारभार आहे. त्यामुळे अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाही हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मोठी घोषणा केली आहे. शिक्षण सेवकांच्या मानधनात घसघशीत वाढ; सरासरी 10 रुपयांचा होणार लाभ होणार
- प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवक : 6000 वरुन 16,000 रुपये
- माध्यमिक शिक्षण सेवक : 8000 वरुन 18,000 रुपये
- उच्च माध्यमिक शिक्षण सेवक : 9000 वरुन 20,000 रुपये
- पीएमश्री शाळा : 816 शाळा/ 5 वर्षांत 1534 कोटी रुपये
COMMENTS