मुंबई । नगर सहयाद्री - सत्तांतरानंतर आज शिंदे-फडणवीस सरकार प्रथमच आपला अर्थसंकल्प सादर करत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे अर्थ...
मुंबई । नगर सहयाद्री -
सत्तांतरानंतर आज शिंदे-फडणवीस सरकार प्रथमच आपला अर्थसंकल्प सादर करत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे अर्थविभागाचा कारभार आहे. त्यामुळे अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाही हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. प्रधान मंत्री किसान सन्मान योजनेत भर. नमो शेतकरी महा सन्मान योजना. शेतकऱ्यांना सहा हजार देणार. केंद्रसह १२ हजार रुपयांचा लाभ मिळणार.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचं छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर विधिमंडळात दाखल झालेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आल्यानंतर सुरवात झाली आहे.
- प्रधान मंत्री किसान सन्मान योजनेत भर. नमो शेतकरी महा सन्मान योजना. शेतकऱ्यांना सहा हजार देणार. केंद्रसह १२ हजार रुपयांचा लाभ मिळणार.
- अपघात शेतकऱ्यांच्या कुटुंबाला दोन लाखापर्यंत सानुग्रह अनुदान देणार.
- धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १५ हजार रुपयांची केली घोषणा.
- मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार. मागेल त्याला फळबाग, मागेल त्याला आधुनिक पेरणीयंत्र देणार.
- शेतकऱ्यांचा पीक विमा सरकार भरणार. नमो शेतकरी योजनेची सरकारकडून घोषणा.
- शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून ६ हजार ९०० कोटी रुपयांची घोषणा.
COMMENTS