नवी दिल्ली/ नगर सह्याद्री - प्रत्येकजण करोडपती बनण्याचे स्वप्न पाह तो पण त्यासाठी इच्छाशक्ती आणि थोड्या प्रयत्नांची गरज असते. नियोजनपूर्वक ...
नवी दिल्ली/ नगर सह्याद्री -
प्रत्येकजण करोडपती बनण्याचे स्वप्न पाह
तो पण त्यासाठी इच्छाशक्ती आणि थोड्या प्रयत्नांची गरज असते. नियोजनपूर्वक केल्यास भविष्यासाठी मोठा निधी उभा करण्याचे सूत्र खूप सोपे आहे. अगदी आपला चहा बंद करूनही तुम्ही करोडपती बनू शकता.तुम्हाला खोटे वाटेल कदाचित तुम्ही म्हणाल कोणी चहा सोडून करोडपती कसा बनू शकतो,पण हे शक्य आहे. त्याचा एक सोपा फॉर्म्युला सांगतो आहे .
आपण आपल्या दिवसाची सुरुवात एक कप चहाने करतो. खरंतर चहा पिणे आपल्या शरीरासाठी अपायकारक असते, त्यामुळे बरेच डॉक्टर चहा न पिण्याचा सल्ला देतात. पण आपल्या दररोजच्या सवयीमुळे काहींना चहा सोडवत नाही मात्र, हाच दररोजचा २० रुपयांचा चहा तुमचं नशीब पालटवू शकतो. तुम्ही नियमित बचत केल्यास तुम्ही आपलं कोट्याधीश बनण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता आणि हे स्वप्न सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून पूर्ण होऊ शकते.
तुम्ही दररोज चहा पिण्याऐवजी त्यातून उरलेल्या पैशाची तुम्ही SIP करू शकता. अनेक म्युच्युअल फंडांनी दीर्घ मुदतीत जबरदस्त परतावा दिला आहे. आपल्याकडे एक कप चहा १० रुपयाचा मिळतो अशा स्थितीत जर तुम्ही दररोज दोन कप चहाचे पैसे म्हणजे २० रुपये वाचवले तर दरमहिन्याला तुम्ही ६०० रुपयांची बचत कराल आणि या रुपयांची योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर तुम्ही सहज करोडोंचा फंड उभा करू शकता. यासाठी ही रक्कम तुम्हाला दर महिन्याला म्युच्युअल फंडात गुंतवावी लागेल. म्युच्युअल फंड दीर्घकालीन गुंतवणुकीत १५ ते २० टक्के परतावा देतो. करून पहा .कमी वय असणाऱ्यांनी तर हा फॉर्मुला नक्की वापरावा.
COMMENTS