भारताने पहिला एकदिवसीय सामना जिंकला मुंबई | वृत्तसंस्था - पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ११ धावांनी पराभव करत तीन वनडे म...
भारताने पहिला एकदिवसीय सामना जिंकला
मुंबई | वृत्तसंस्था -
पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ११ धावांनी पराभव करत तीन वनडे मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. दुसरा एकदिवसीय सामना रविवारी विशाखापट्टणम येथील मैदानावर होईल. पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात डायव्हिंग झेल घेणारा भारताचा रवींद्र जडेजा सामनावीर ठरला.
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मिचेल मार्शने ८१ धावांची धडाकेबाज खेळी केली. रवींद्र जडेजाने त्याला हार्दिक पांड्याकडून झेलबाद केले. त्यानंतर जडेजाने मार्नस लाबुशेनचा शानदार डायव्हिंग झेल टिपला. कुलदीप यादवने चेंडू ऑफ स्टंपवर टाकल्यानंतर तो हवेत असताना जडेजाने झेल घेण्यासाठी १० फूट लांब डायव्ह केली. त्यामुळे लाबुशेनला केवळ १५ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. यानंतर जडेजाने ग्लेन मॅसवेलची विकेटही घेतली. दुसर्या डावात केएल राहुलसोबत १०८ धावांची नाबाद भागीदारी करत त्याने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. या कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना पाहण्यासाठी अनेक माजी क्रिकेटपटू आणि बॉलिवूड स्टार पोहोचले. यामध्ये अभिनेता रजनीकांत आणि अजय देवगण, उद्योगपती आनंद महिंद्रा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आससीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार, माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांचा समावेश होता. भारताच्या मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात २९ धावांत ३ बळी घेतले. सलामीवीर ट्रॅव्हिस हेडला बोल्ड केल्यानंतर त्याने सीन अॅबॉट आणि अॅडम जंपाची विकेट घेतली.
दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळायचा. वानखेडे स्टेडियमवर त्यांच्या नावाने स्टँड बांधण्यात आला आहे. सामन्यादरम्यान एक क्षण असा आला जेव्हा स्टेडियममध्ये बसलेले प्रेक्षक ’सचिन...सचिन...’ म्हणत होते. प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडिअममध्ये सचिनशिवाय विराट कोहली, केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांच्या नावाचाही जयघोष करण्यात आला. सामन्याच्या पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करताना भारताचा विराट कोहली ऑस्कर विजेत्या ’नाटू नाटू’ गाण्यावर डान्स स्टेप्स करताना दिसला. १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. दुसर्या षटकातच संघाने इशान किशनची विकेट गमावली. त्याच्यानंतर पाचव्या षटकात मिचेल स्टार्कने विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. सूर्या बाद होताच भारताची धावसंख्या १६ बाद ३ अशी होती, त्यानंतर स्टेडियममध्ये सर्वत्र शांतता पसरली. स्टार्कने ९.५ षटकात ३ विकेट्स घेत आपला स्पेल संपवला, पण यष्टिरक्षक केएल राहुल आणि रवींद्र जडेजाच्या दमदार फलंदाजीमुळे भारताने सामना ५ विकेट्सने जिंकला.
COMMENTS