अहमदनगर | नगर सह्याद्री- फ्लॅट घेण्यासाठी आई-वडिलांकडून १० लाख रूपये आणावेत या मागणीकरता विवाहितेचा सासरी छळ केल्याची घटना समोर आली आहे. नगर...
फ्लॅट घेण्यासाठी आई-वडिलांकडून १० लाख रूपये आणावेत या मागणीकरता विवाहितेचा सासरी छळ केल्याची घटना समोर आली आहे. नगर शहरात राहणार्या पीडित विवाहितेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती विजयकुमार सुर्यकांत काजवे, विजयलक्ष्मी सुर्यकांत काजवे (दोघे रा. राहणे मळा, संगमनेर), मामे सासरे प्रदीप विष्णुपंत भंडारी, सुदीप प्रदीप भंडारी (दोघे रा. धारणगाव रोड, कोपरगाव), अरूण विष्णुपंत भंडारी, अरूणा अरूण भंडारी, अक्षय अरूण भंडारी, ऐश्वर्या अरूण भंडारी (सर्व रा. नालेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नाव आहे.
फिर्यादीचा विवाह ऑगस्ट, २०२१ मध्ये विजयकुमार काजवेसोबत झाला होता. विवाहनंतर दोन महिन्यानंतर फिर्यादी सासरी नांदत असताना त्यांना पतीसह आठ जणांनी वेळोवेळी मारहाण करून आई-वडिलांकडून १० लाख रूपये फ्लॅट घेण्यासाठी आणावेत या मागणी करीता छळ केला. दरम्यान या छळाला कंटाळून फिर्यादीने भरोसा सेलकडे तक्रार दिली होती. तेथे समझोता न झाल्याने अखेर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
COMMENTS