अकोला / नगर सहयाद्री- अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अकोल्यात एच-३ एन-२ विषाणूने सात वर्षीय मुलाचा बळी घेतला घटना घडली ...
अकोला / नगर सहयाद्री-
अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अकोल्यात एच-३ एन-२ विषाणूने सात वर्षीय मुलाचा बळी घेतला घटना घडली आहे. हॉस्पिटल मध्ये दाखल असलेल्या व दुर्दैवाने मृत्यू झालेल्या वाशिम येथील एका सात वर्षीय मुलाचा अहवाल गुरुवार 'एच-३ एन-२' पॉझिटिव्ह आला आहे.नागरिकांनी घाबरुन न जाता. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काळजी घेणे गरजेचे आहे.
कोरोनाच्या दहशतीतून आता कुठं सावरत असतांनाच 'एन्फ्लुएन्झा ए' या विषाणूचा उपप्रकार असलेल्या 'एच३ एन२'चा देशभरात झपाट्याने फैलाव होत असल्याच्या घटना समोर येत आहे.स्वाईन फ्लू चा प्रकार असलेल्या या आजाराने अकोल्यातही एंट्री केली असून एका सात वर्षीय मुलाचा मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक बाब गुरुवारी समोर आली आहे.
काही दिवसांपासून घरोघरी सर्दी व तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.ताप असलेल्या सर्व रुग्णांची तपासणी होत नसल्याचे वास्तव असून यामध्ये 'एच-३ एन-२' आणि 'एच-१ एन-१' चे देखील मोठ्या प्रमाणात रुग्ण असल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे.या आजाराचा फैलाव होण्याचा वेग मोठ्या प्रमाणात असून लहान मुले, वृद्ध आणि दुर्धर आजार असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
COMMENTS