अहमदनगर | नगर सह्याद्री शहरात गेल्या काही दिवसांपासून जातीय तेढ निर्माण करणार्या गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. या सर्व घटनांना राजकीय हेतूप...
अहमदनगर | नगर सह्याद्री
शहरात गेल्या काही दिवसांपासून जातीय तेढ निर्माण करणार्या गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. या सर्व घटनांना राजकीय हेतूपोटी धार्मिक स्वरूप देण्यात येत असून शहराचे वातावरण दुषित करण्याचे काम काही स्वप्नाळू राजकारणी करत आहेत,त्यांचा शोध घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने पोलीस उपअधिक्षकांडे निवेदनाव्दारे केली आहे.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, नगरसेवक प्रकाश भागानगरे, अंकुश चत्तर, भूषण गुंड, सागर शिंदे, शरद जाधव, दिपक लिपाने, सोन्याबापू घेबुड, सागर गुंजाळ, जितेंद्र बनकर आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, शहरामध्ये सध्या राजकीय व्यक्ती विशिष्ट हेतुपायी तरुणांची माथी भडकावून त्यांच्या हातून काही गुन्हे करण्यास प्रवृत्त करत असून याबाबतची आपण माहिती घेऊन या मागील मुख्य सुत्रधार कोण आहेत. हे शोधण्याची गरज निर्माण होत आहे.
रामवाडी परिसरात व महेश टॉकीज येथील घटनेमध्ये जे खरोखर गुन्हेगार आहेत,अशांवरच गुन्हे दाखल करायला हवे होते. परंतु राजकीय दबावापोटी काही निर्दोष व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये नगर शहरातील दोन्ही समाजाच्या निर्दोष तरुण मुलांवर गुन्हे दाखल करून त्यांचे आयुष्य उध्दस्त करण्याचा केविलवाणा प्रयत्न चालू आहे. त्यावर देखील सखोल चौकशी करून अशा निर्दोष तरुणांवर दाखल केलेल्या गुन्ह्यांमधून त्यांची मुक्तता करणे गरजेचे आहे.
शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते म्हणाले की, शहरात काही जातीवादी घटना घडत आहेत.१० मार्च रोजी शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी होणार आहे. मात्र काही लोकं राजकीय हेतूपोटी अनुचित प्रकार घडवण्यासाठी प्रयत्न करतील पोलीस प्रशासनाने याची खबरदारी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. नगरसेवक प्रकाश भागानगरे म्हणाले की, नगर शहराला बदनाम करण्याचे काम सुरु आहे. दोन जातीमध्ये तेढ निर्माण करून शहराचे वातावरण खराब करणार्या लोकांवर कठोर कारवाई करावी.शहर पोलीस उपाधीक्षक अनिल कातकाडे यांनी शिष्टमंडळास चुकीची कारवाई होणार नाही, तपास करूनच खर्या गुन्हेगारांचा शोध घेऊ, खरे गुन्हेगार शोधून काढले जातील अशी ग्वाही दिली
COMMENTS