अहमदनगर | नगर सह्याद्री- गावच्या जत्रेत किरकोळ कारणावरून दोघा युवकांवर कोयत्याने तसेच कुदळीने जीवघेणा हल्ला करत त्यांना जीवे ठार मारण्याचा प...
अहमदनगर | नगर सह्याद्री-
गावच्या जत्रेत किरकोळ कारणावरून दोघा युवकांवर कोयत्याने तसेच कुदळीने जीवघेणा हल्ला करत त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर तालुयातील देहरे गावात मंगळवारी (दि.७) दुपारी घडली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या दोघा युवकांवर नगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून हल्ला करणार्या दोघा जणांना एम.आय.डी.सी. पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत राजेंद्र शिवाजी लांडगे (वय ४१, रा.लांडगे वस्ती ,देहरे ता.नगर) यांनी एम.आय.डी.सी. पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंगळवारी (दि.७) देहरे गावात ग्रामदैवतांचा वार्षिक यात्रोत्सव होता. त्यानिमित्ताने गावात विविध खेळण्यांची दुकाने लागलेली होती. या यात्रेत दुपारी ३.३० च्या सुमारास रेल्वे टपरीजवळ रस्त्यावर घड्याळ विक्री करण्यासाठी आलेल्या ईसमास आकाश शिवाजी जाधव हा त्याचे सोबत आलेला त्याचा एक अनोळखी पाहुणा (नाव पत्ता माहित नाही) हे दम देत असताना त्यांना फिर्यादी यांचा पुतण्या ऋषीकेश संजय लांडगे व पुतन्याचा मिञ विशाल ज्ञानदेव करांडे व अन्य २-३ जणांनी तुम्ही घड्याळ विक्री करुन पोट भरण्यासाठी आलेल्या घड्याळ विक्रेत्यास का दम देत आहात?
असे विचारल्याच्या कारणावरुन आरोपी आकाश शिवाजी जाधव (रा. देहरे, ता.नगर) याने व त्याचा एक अनोळखी पाहुणा (नाव पत्ता माहित नाही) यांनी शिवीगाळ करुन तेथे याञेत शेती उपयोगी खुरपे ,कोयता, कुदळ असे वस्तु विक्रीसाठी आणलेल्या व विक्रीसाठी ठेवलेल्या ईसमांकडील कोयता व कुदळ हातात घेऊन ऋषीकेश लांडगे यास कुदळीने उजव्या हातावर तसेच पुतन्याचा मिञ विशाल करांडे यास आकाश याचे सोबत आलेल्या अनोळखी पाहुण्याने मारहाण केली. तर आकाश जाधव याने कोयत्याने पाठीवर वार करुन त्या दोघांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे या फिर्यादीत म्हंटले आहे. या घटनेनंतर तेथे मोठा गोंधळ उडाला, यावेळी काही नागरिकांनी जखमी दोघा युवकांना उपचारासाठी नगरला हलविले.
याबाबतची फिर्याद लांडगे यांनी दिल्यावर पोलिसांनी आरोपी आकाश जाधव व त्याचा पाव्हना या दोघांवर भा.दं.वि. कलम ३०७ ,५०४,३४ सह आर्म अँट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच स.पो.नि. राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ यांच्यासह पथकाने दोघा आरोपींना अटक केली.
COMMENTS