मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद आणि तिचं अजब फॅशन जगजाहीर आहे. सोशल मीडियावर दररोज उर्फी चित्रविचित्र कपड्यांमध्ये पहायला मिळते. अनेकदा यामुळे...
मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद आणि तिचं अजब फॅशन जगजाहीर आहे. सोशल मीडियावर दररोज उर्फी चित्रविचित्र कपड्यांमध्ये पहायला मिळते. अनेकदा यामुळे तिला ट्रोल केलं जातं. मात्र उर्फी या ट्रोलिंगलाही जुमानत नाही. नेहमीच अतरंगी फॅशन सेन्समुळे चर्चेत असलेली उर्फी आता तिच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे चर्चेचा विषय ठरली आहे. गुरुवारी तिने ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये एक पुष्पगुच्छ आणि त्यासोबत मोठा पोस्टर कार्ड पहायला मिळतोय. या कार्डवर सोनेरी अक्षरांत लिहिलंय, त्याने हो म्हटलंय’. हृदयाचा इमोजी पोस्ट करत उर्फीने हा फोटो अपलोड केला आहे. त्यामुळे उर्फीने नेमकं कोणाला प्रपोज केलंय, असा प्रश्न नेटकर्यांना पडला आहे. उर्फीने हा फोटो पोस्ट करताच त्यावर लाइस आणि कमेंट्सचा वर्षाव होऊ लागला. अनेकांनी त्यावर कमेंट्स करत उर्फीला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. तुला नाहीच मिळणार’, असं एकाने लिहिलंय. तर आता सर्वांसमोर नाव नको घेऊस’ अशी मस्करी दुसर्या युजरने केली. त्याला शुभेच्छांची फार गरज असेल’ असंही नेटकर्यांनी लिहिलंय. उर्फी याआधी टीव्ही अभिनेता पारस कलनावतला डेट करत होती. मात्र या दोघांचं रिलेशनशिप फार काळ टिकलं नाही. पारसने अनुपमा’ या लोकप्रिय मालिकेत भूमिका साकारली होती. या ब्रेकअपबद्दल उर्फी म्हणाली होती, आम्ही रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर एका महिन्यातच मला ब्रेकअप करायचं होतं. तो लहान होता आणि प्रत्येक गोष्टीबाबत तो पझेसिव्ह होता. त्याने माझ्या नावाचे तीन टॅटू काढून माझं मन जिंकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ब्रेकअप झाल्यानंतर असं कोण करतं? मी तरी केलं नसतं. उर्फी जावेद तिच्या सेमी-न्यूड कपड्यांमुळे नेहमीच नेटकर्यांचं लक्ष वेधून घेते. तोकड्या कपड्यांमुळे उर्फीला विविध समस्यांचाही सामना करावा लागला. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तर दुसरीकडे करणी सेनेनंही तिला धमकी दिली होती. काय योग्य आणि काय अयोग्य हे कोण ठरवतं? सेलिब्रिटी म्हणतात की मी हे सर्व प्रसिद्धीसाठी आणि लोकांचं लक्ष वेधण्यासाठी करतेय. होय, मी लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठीच हे सर्व करतेय. ही इंडस्ट्रीच लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी आहे. त्यात चुकीचं काय आहे, असा सवाल उर्फीने केला होता.
COMMENTS