नाशिक / नगर सहयाद्री - नाशिक मधील अंबड येथे हा अनोखा प्रकार घडला आहे.आयुष्यात आपलं स्वतःचं एक तरी घरं असावं म्हणून एका व्यक्तीने फ्लॅट खरेद...
नाशिक / नगर सहयाद्री -
नाशिक मधील अंबड येथे हा अनोखा प्रकार घडला आहे.आयुष्यात आपलं स्वतःचं एक तरी घरं असावं म्हणून एका व्यक्तीने फ्लॅट खरेदी केला, मोठ्या उत्सहात गृहप्रवेशही केला. सात-बारा उतारा काढून पहिला तर त्यांना मोठा धक्काच बसला आहे. त्यामुळे थेट न्यायायलात धाव घ्यावी लागली असून फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, न्यायालयाच्या आदेशावरुन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळ्यातील साक्री येथील रहिवासी अशोक विठ्ठल कोठावदे आणि सुनीता अशोक कोठावदे यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोठावदे दाम्पत्याचा वावरे एम्पायर अपार्टमेंटमध्ये प्लॅट होता. तोच प्लॅट त्यांनी दिनेश रावसाहेब चव्हाण यांना विकला होता. त्यादरम्यान प्लॅट कुठेलही कर्ज नाही असे सांगितले होते. खरेदी झाल्यानंतर त्या फ्लॅटवर धुळे येथील एका पतसंस्थेचे 23 लाखांहून अधिक किंमतीचे कर्ज असल्याचे समोर आले.
त्यानंतर चव्हाण यांनी कोठावदे यांना फोन केला आणि विचारणा केली तर उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यानंतर चव्हाण यांनी न्यायालयात धाव घेतली. आपली फसवणूक केल्याची याचिका दाखल करत त्यावर नुकतीच सुनावणी पार पडली असून न्यायालयाच्या आदेशावरून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घर खरेदी करताना आवर्जुन तपासा.
घर रेडिमेड अथवा बांधकाम करून घेतांना काही कागदपत्रे अत्यावश्यक आहेत जसें की बांधकाम परवाना पत्र, मंजूर नकाशा, ७/१२ नोंद, सिटीसर्वे उतारा, जागेचा सर्च रिपोर्ट, जमीन अकृषक (NA) असल्याचा दाखला, जागेचे खरेदी खत, मुखत्यारपत्र, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला, हस्तांतरण दाखला इत्यादी आवर्जुन तपासा.
COMMENTS